Advertisement

४५ वयापुढील सर्वांना मिळावा कोविड डोस, मुख्यमंत्र्यांचा आग्रह

४५ वयापुढील सर्वांना कोविड लसीचा डोस मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत.

४५ वयापुढील सर्वांना मिळावा कोविड डोस, मुख्यमंत्र्यांचा आग्रह
SHARES

कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना कोविड लसीचा डोस देण्यात येत आहे. परंतु ४५ वयापुढील सर्वांना कोविड लसीचा डोस मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आग्रही आहेत. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील केली आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी बुधवारी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोविडच्या स्थितीची माहिती देताना ही मागणी केली.

यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना घडत आहेत. महाराष्ट्राने वेळोवेळी केंद्रीय पथकांनी दिलेले सल्ले व मार्गदर्शन याप्रमाणे कोविडची लढाई लढली आहे. मधल्या काही काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती. मात्र आता काही जिल्ह्यांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. 

महाराष्ट्र (maharashtra) किंवा देशाच्या पश्चिमी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा. विषाणूचे हे कुठले म्युटेशन किंवा आणखी काही प्रकार आहे का याविषयी मार्गदर्शन व्हावं, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.

हेही वाचा- कोरोनाची दुसरी लाट रोखायला हवी, पंतप्रधानांचे राज्यांना निर्देश

राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्या जोडीनेच मास्क वापरत राहणं, सुरक्षित अंतर ठेवणं या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे, हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वांना लसीकरण करावं, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचं काम समाधानकारक आहे, असं सादरीकरणाच्या दरम्यान आरोग्य सचिवांनी सांगितलं. महाराष्ट्रात आज सरासरी प्रत्येक दिवशी १ लाख ३८ हजार ९५७ डोस देण्यात येतात. इतर काही प्रमुख राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक आहे. मात्र ते आणखीही वाढवावं, असं सांगण्यात आलं. राज्यात आजमितीस ३५ लाख ५२ हजार डोसेस देण्यात आले असून ३१ लाख ३८ हजार ४६३ डोसेस उपलब्ध आहेत. दररोज ३ लाख डोसेस दिल्यास १० दिवसांचा साठा असून तो अधिक वाढवून मिळावा, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली .

महाराष्ट्रात १ मार्च रोजी ७ हजार ७४१ इतके कोरोनाबाधित (coronavirus) रुग्ण वाढले होते. १५ मार्च रोजी हा आकडा १३ हजार ५२७ इतका झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून १ मार्च रोजी पॉझिटिव्हिटी दर १० टक्के होता, तो आता १६ टक्के झाला आहे. यावर चाचण्यांची संख्या अधिक वाढविणं गरजेचं आहे, असं सादरीकरणाच्या वेळी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा