Advertisement

मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यात ‘डाँक्टर आपल्या दारी” संकल्पना सुरू

‘डाँक्टर आपल्या दारी” या संकल्पने अंतर्गत या टिमने मालाड, घाटकोपर, टीळकनगर पोलीस स्टेशन, ठाणे आणि डोंबिवलीतील पोलीस स्टेशनसह जवळ जवळ ६० हून अधिक पोलीस स्टेशनना आपल्या टीमने भेट देत पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.

मुंबईतल्या सर्व पोलिस ठाण्यात ‘डाँक्टर आपल्या दारी” संकल्पना सुरू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. मुंबईचे पोलिस नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले. मात्र या महामारीने त्यांना ही सोडलेलं नाही. मुंबई पोलिस दलातील २०२८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील १२३३ जणांनी कोरोनावर मात केली. मात्र ७४० पोलिसांवर आज ही उपचार सुरू आहेत. राज्याच्या आकडेवारीत मुंबई पोलिस दलातील कोरोना बाधीतांची संख्या सर्वाधिक असल्याने मुंबई पोलिस दलातील प्रत्येक पोलिसाची त्यांची प्राथमिक तपासणी होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमिवर क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम यशस्विरित्या राबविण्यात येत आहे.

‘डाँक्टर आपल्या दारी” या संकल्पने अंतर्गत या टिमने मालाड, घाटकोपर, टीळकनगर पोलीस स्टेशन, ठाणे आणि डोंबिवलीतील पोलीस स्टेशनसह जवळ जवळ ६० हून अधिक पोलीस स्टेशनना आपल्या टीमने भेट देत पोलिसांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.  त्याच बरोबर महिनाभरात जी-साऊथ, जी-नॉर्थ, एफ नॉर्थ, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, वांद्रे, मुलुंड, घाटकोपर, भांडुप, पवई, मीरा-भाइंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ या भागामध्ये या मोबाईल क्लिनिक सेवेचा लाभ मिळत आहे. यासाठी सुमारे ५७ डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत घेत ५७ पेक्षा जास्त मोबाईल डिस्पेंसरी व्हॅन सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत डॉक्टर आपल्या दारीचा ३,४६,४८५ मुंबईकरांनी लाभ घेतला आहे. यातील ५,६५८  रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.      

 •       क्रेडाई-एमसीएचआय, भारतीय जैन संघटना आणि देश अपनाये यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महानगरपालिकांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर आपल्या दारीचा उपक्रम

•        57 पेक्षा जास्त मोबाइल डिस्पेंसरी व्हॅनची मदत

•        3,46,385 मुंबईकरांनी घेतला प्राथमिक तपासणीचा लाभ

•        5,658 रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

भारतीय जैन संघटनेतर्फे राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ एप्रिल ते आतापर्यंत १२,७०,५८७ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. तर १५,४८२ रुग्णांना संशयित रुग्ण म्हणून सरकारी रुग्णालयात जाण्यासा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी आतापर्यंत २२७ डॉक्टरांच्या मदतीने २२७ मोबाइल क्लिनिक व्हॅनचा वापर करण्यात आला आहे.  आता तर या व्हॅन यशस्वीरित्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरू केल्या आहेत.”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा