Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण
SHARES

केंद्रीय अधिवेशन सुरू असतानाच भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्री मंडळातील महत्वाचे मंंत्री म्हणून ओळखले जाणारे,  केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी यांंना कोरोनाची लागण  झाल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी गडकरी यांंनी स्वतः ट्विट करुन माहिती दिली आहे. काल पासुन गडकरी यांंना किंंचित तब्येत बिघडल्यासारखे वाटत होती. त्यामुळे डॉक्टरांंचा सल्ला घेतला असता त्यांंना कोरोनाची चाचणी करुन घेण्यास सांंगितले गेले होते. आज त्या चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


हेही वाचाः- Good News: राज्यात पोलिसांची मेगा भरती; १२,५२८ जागा भरणार

दरम्यान, कोरोनाची लागण झाली असली तरी  आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत असल्यामुळेच माझी प्रकृती स्थिर आहे. मी स्वतःला आयसोलेट करुन घेतले आहे अशी माहिती गडकरी यांंनी दिली आहे. या मागील काळात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ते प्रोटोकॉल पाळुन खबरदारी बाळगावी असे आवाहनही गडकरी यांंनी केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आता नितिन गडकरी हे सध्या सुरु असणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी देखील अनुपस्थित राहणार आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे , परवेश साहिब सिंह यांंच्यासह अन्य १७ खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दुसरीकडे कोरोनावर मात करुनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अमित शाह सुद्धा हॉस्पिटल मध्ये आहेत अशात आता गडकरींंना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय