Advertisement

अमेरिकेकडून भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत, कंसंट्रेटर मशिन बद्दल जाणून घ्या

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं अमेरिकेनें भारताला मदतीचा हात पुढे केला आहे.

अमेरिकेकडून भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत, कंसंट्रेटर मशिन बद्दल जाणून घ्या
SHARES

भारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं अमेरिकेनें भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेनं भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले आहेत. एअर इंडियाच्या विमानानं अमेरिकेतून हे मशिन्स भारतात आले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असं सिंग यांनी म्हटलं आहे.


ऑक्सिजन कंसंट्रेटर म्हणजे?

ऑक्सिजन कंसंट्रेटर ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्याच या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात.

मेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी ३० ते ६० हजार रुपयात बनवले जातात. काही पोर्टबल मशीन खूप छोट्या असतात. त्याची किंमत ३ ते ५ हजार रुपये असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात. ऑक्सिजन सिलेंडर आणि रिफलिंगच्या तुलनेत या मशीन स्वस्त आणि सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करतात, त्यातून ऑक्सिजन कायम राहतो.हेही वाचा

दिलासादायक! मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा