Advertisement

दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी गुरुवारी लसीकरण

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह आसपासच्या परिसरात लसीकरण केलं जातं आहे.

दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांसाठी गुरुवारी लसीकरण
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह आसपासच्या परिसरात लसीकरण केलं जातं आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या लसीकरणात अनेकांनी पहिला डोस घेतला. परंतु, दुसऱ्या डोससाठी अजूनही अनेकजण प्रतिक्षेत आहेत. त्यामुळं या नागरिकांसाठी गुरुवारी सर्व केंद्रावर विशेष लसीकरण महापालिकेनं आयोजित केलं आहे.

या दिवशी पहिली मात्रा दिली जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे महापालिकेनं जाहीर केले आहे. कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेसाठी २ लाख ६० हजार नागरिक प्रतीक्षेत होते. दुसऱ्या मात्रेचा कालावधी सुरू झाला तरी यांना लस मिळत नसल्यामुळं महापालिकेनं विशेष लसीकरण गेल्या आठवड्यात ४ सप्टेंबर रोजी आयोजित केले होते. यामध्ये १ लाख ७९ हजार ९३८ नागरिकांना दुसरी मात्रा दिली गेली. तेव्हा उर्वरित दुसऱ्या मात्राधारकांसाठी ९ सप्टेंबर रोजी पुन्हा विशेष लसीकरण आयोजित करण्यात आले आहे.

ठाण्यात गणेशोत्सव काळात लसीकरण बंद

महापालिका क्षेत्रात लशींचा साठा उपलब्ध होऊ लागल्यानं गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेला वेग आला असतानाच गणेशोत्सवाच्या काळात लसीकरण मोहीम बंद ठेवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे. या निर्णयानुसार गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन असे पाच दिवस शहरात लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे.

या निर्णयानुसार १०, ११, १४, १६ व १९ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असल्याचे पालिकेने कळविले आहे. संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

या काळात लसीकरणासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा