Advertisement

अँजिओप्लास्टीचा 'तो' व्हायरल व्हिडिओ खोटा, जे. जे. हॉस्पिटलचा खुलासा

जे. जे. रुग्णालयात हार्ट ब्लॉकेजचा उपचार ५ हजारांत करून मिळेल, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. पण, हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाने दिली आहे. शिवाय, अशा व्हायरल माहितीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही जे. जे. रुग्णालयाच्या कार्डियोलॉजी विभागातर्फे करण्यात आलं आहे.

अँजिओप्लास्टीचा 'तो' व्हायरल व्हिडिओ खोटा, जे. जे. हॉस्पिटलचा खुलासा
SHARES

जे. जे. रुग्णालयाच्या नावाने एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जे. जे. रुग्णालयात हार्ट ब्लॉकेजचा उपचार ५ हजारांत करून मिळेल, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे. पण, हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाने दिली आहे. शिवाय, अशा व्हायरल माहितीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही जे. जे. रुग्णालयाच्या कार्डियोलॉजी विभागातर्फे करण्यात आलं आहे.



अँजिओप्लास्टीचा खर्च ४० हजार

साधारणपणे अँजिओप्लास्टीचा खर्च जवळपास ४० ते ५० हजार रुपये असतो. पण, या व्हिडिओत फक्त ५ हजार रुपयांत अँजिओप्लास्टी करुन मिळेल असं सांगण्यात आलं आहे.



हा बोगस व्हिडिओ आहे. जगात आतापर्यंत कुठेही अशा प्रकारची टेक्नोलॉजी नाही, जिथे ५ हजारात अँजिओप्लास्टी करून मिळेल. त्यामुळे अशा व्हायरल व्हिडिओवर विश्र्वास ठेऊ नये. आधी चौकशी करा. सरकारी रुग्णालयात विचारपूस करा. मगच उपचार घ्या.

डॉ . नरेंद्र बन्सल, ह्रदयरोग विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय


जगात कुठेही असं संशोधन नाही

अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची शहानिशा केली जात नाही. त्यातूनच गैरसमज निर्माण होतात. शिवाय, अँजिओप्लास्टीविषयी दाखवण्यात आलेलं तंत्रज्ञानही खोटं असल्याचं जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर सांगतात.



हेही वाचा

जे. जे. रुग्णालयात लवकरच कॉस्मेटिक बाह्यरुग्ण विभाग


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा