Advertisement

“देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहा!”

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने अवघा देश हादरलेला असताना कोरोनाची तिसरी लाट ही अटळ असून त्यासाठी तयार राहण्याचा इशारा केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी दिला आहे.

“देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहा!”
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने अवघा देश हादरलेला असताना कोरोनाची तिसरी लाट ही अटळ असून त्यासाठी तयार राहण्याचा इशारा केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारावजा माहिती दिली.

सध्याच्या घडीला देशात दररोज ३ लाखांहून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर साडेतीन हजारांहून कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोना बळींच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला भारत हळुहळू वर चढत आहे. देशातील अनेक राज्यात रुग्णालय ओसांडून वाहत आहेत. रुग्णांना बेड्स मिळेनासे झालेत. आॅक्सिजनच्या तुटवड्याने अनेकजण दरदिवशी प्राणाला मुकत आहेत. रेमडेसिवीर, व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवतोय. कोरोना उद्रेकात अख्खच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. 

देशातील या कोरोना संकटावर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक शक्तिशाली म्युटंट स्ट्रेन लोकांना अत्यंत वेगाने आजारी पाडत आहे. तर दुसऱ्या बाजूला अडखळत, तुटवड्यावर मात करत लसीकरणही सुरू आहे. 

हेही वाचा- देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर

यातच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी तिसऱ्या लाटेला तयार राहण्याचाही इशारा दिला आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, त्यात किती लोकांना कोरोनाची लागण होईल, हे सांगता येणं कठीण आहे. तरीही आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं, असं ते म्हणाले आहेत.

लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, कोरोनाचे नवे प्रकार जसे जगभरातील विविध देशांत आढळून येत आहेत. तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत. परंतु त्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लसी कोरोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवर परिणामकारक आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा