Advertisement

तुम्हाला दमा आहे? मग दिवाळीत ही काळजी घ्या!


तुम्हाला दमा आहे? मग दिवाळीत ही काळजी घ्या!
SHARES

दिवाळी म्हटलं की फटाके आलेच. पण, या फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण, फटाक्यांच्या निर्मितीसाठी दारूचा वापर केला जातो.

शिवाय, फटाके फोडल्यानंतर कॉपर, झिंक, सोडियम, पोटॅशिअम अशा नष्ट न होणाऱ्या रासायनिक तत्वांचं उत्सर्जन होतं. जे मानवी शरीरासाठी घातक आहे. यातून दमा, डोकेदुखी, रक्तदाब, त्वचारोग आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

फटाक्यांचा त्रास दिवाळीत दमेकऱ्यांना जास्त होतो. त्यामुळेच या दिवाळीत दमेकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याविषयी ‘मुंबई लाइव्ह’ने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काय करावं? आणि काय करु नये? याचा सल्ला दिला आहे.


दिवाळीत दमेकऱ्यांनी ही काळजी घ्यावी

  • दिवाळीत शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळावं
  • बाहेर पडल्यास नाकाला आणि तोंडाला झाकून ठेवावं
  • थंडी सुरू झाली की मॉर्निंग वॉक टाळावा
  • दिवाळीत गरम पदार्थ खावेत
  • जास्त गोड, आंबट, खारट पदार्थ टाळावेत
  • शिळे अन्न, बेकरीतील पदार्थ टाळावेत
  • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावेत
  • धूम्रपान टाळावे


हे सर्वात महत्त्वाचं...

जर एखाद्या व्यक्तीला अस्थमाचा अटॅक आला, तर तो त्रास आणखी वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सतत पंपिंग स्प्रे आपल्यासोबत ठेवावा, असा सल्लाही डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिला आहे.


कसा होतो दमा ?

श्वासनलिकेवर सूज आल्यामुळे अथवा मोकस (mucus-एक चिकट पदार्थ) जास्त प्रमाणात स्त्रवण झाल्यामुळे श्वासनलिकेचा मार्ग अरुंद होऊन श्वासोच्छ्वास प्रक्रिया त्रासदायक होते. काही व्यक्तींना ठराविक पदार्थांची अॅलर्जी असते. अशा पदार्थांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना दमा होऊ शकतो.


दम्याची मुख्य लक्षणं

  • सर्दीने सुरुवात होऊन कफ छातीत साठतो
  • वारंवार खोकला येतो
  • खोकला रात्रीच्या वेळी जास्त बळावतो
  • कधी छातीमधून शिटीसारखा आवाज ऐकू येतो
  • अनुवांशिक आजारामुळे
  • अॅलर्जी असल्यामुळे



हेही वाचा

ब्रिटिशांच्या काळात एका मराठी माणसाने उभारले पहिले बंदर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा