Advertisement

कोविडची लक्षणं आढळल्यास काय कराल?

कोरोनाची लक्षणं आढळल्यास काय करावं जाणून घ्या.

कोविडची लक्षणं आढळल्यास काय कराल?
SHARES

कोरोनाच्या (Corona) भितीनं नागरिकांच्या मनात घर केलं आहे. साधा सर्दी, खोकला असेल तरी नागरिक घाबरतात. डॉक्टर चाचणी करायला सांगतिल म्हणून घरातच क्रोसिन, पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतात. पण हे जास्त हानिकारक ठरू शकतं. चला तर जाणून घ्या अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे?


लक्षणं आढळल्यास काय करावं?

  • सर्दी, ताप असेल तर सर्वात प्रथम आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
  • घरगुती औषध (home remedies) करून आजार अंगावर काढू नका. 
  • सर्दी-खोकला आहे म्हणून कोरोना झालाय असं होत नाही.
  • सर्दी-खोकल्सोबत इतर लक्षणं जसं की, तोंडाची चव जाणे, वास न येणे, डोकं किंवा अंग दुखणं, खूप जोप येणं, घसा खवखवणे होत असेल तर डॉक्टर कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देतील.


चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काय करायचं?

  • कोरोना चाचणी तुम्ही पालिकेकडून (BMC) किंवा खाजगी लॅबमधून करू शकता.
  • तुमचे रिपोर्ट पालिकेला पाठवले जातील.
  • त्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह (positive) आली तर पालिकेकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल.
  • तुमची सगळी माहिती घेतली जाईल. तुम्हाला दुसरा कुठला गंभीर आजार आहे की नाही, तुमच्या घरात दोन रुम, बाथरूम आहे का? याची माहिती घेतली जाईल.
  • जर दुसरा कुठला आजारा असेल तर तुम्हाला कोविड सेंटर(Covid center) मध्ये पाठवलं जातं.
  • याशिवाय घरं लहान असेल किंवा घरातील कुटुंब मोठं असेल, घरात इतर आजारी रुग्ण असेल तरीही तुम्हाला कोविड सेंटरमध्ये जावं लागेल. जेणे करून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये.
  • घरात वेगळी खोली, बाथरूम आणि इतर रुग्ण नसेल तर घरातच क्वारंटाईन होण्यास परवानगी दिली जाते.
  • पालिके तर्फे एक पथक घरी येऊन सगळी पाहणी करून तुम्हाला तपासून औषध देतात.
  • १५ दिवसानंतर तुमची कोरोना चाचणी केली जाते. रिपोर्ट नेगेटिव्ह आले तरीही पुढील १४ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितलं जातं.



हेही वाचा

भारतात उपलब्ध 'या' लसी किती प्रभावशाली? जाणून घ्या एकूण एक माहिती

कोरोना प्रतिबंधक लस घेणं का गरजेचं आहे?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा