Advertisement

आपल्याला कोरोनाव्हायरससोबतच जगावं लागेल : WHO

जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांच्या वक्तव्यानं चिंतेत अधिक भर पडली आहे.

आपल्याला कोरोनाव्हायरससोबतच जगावं लागेल : WHO
SHARES

कोरोनाव्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाव्हायरसला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लस बनवली जात आहे. पण अद्याप कुठलीच लस बनवण्यात आली नाही. त्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांच्या वक्तव्यानं तर चिंतेत भर टाकण्याचं काम केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ माईक रेयान म्हणाले की, कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणाह नाही. जगानं यासोबतच जगायला शिकलं पाहिजे. एचआयव्ही देखील अद्याप संपला नाही. परंतु आपण त्याच्याबरोबर जगत आहोत.

रेयान म्हणाले की, "मी या दोन आजारांची तुलना करीत नाही. परंतु आपणास वास्तव समजलं पाहिजे. कोरोना कधीपर्यंत संपुष्टात येईल याचा कोणताही अंदाज लावता येत नाहीय"

डब्ल्यूएचओचं म्हणणं आहे की, संसर्गाची नवीन प्रकरणं येत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाउन काढून टाकल्यास रोग पुन्हा पसरू शकेल. पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची गरज भासू शकते. जेव्हा नवीन प्रकरणांचा दर खालच्या स्तरावर येईल आणि बहुतांश संक्रमित बरे होतील तेव्हाच लॉकडाउन उठवणं योग्य ठरेल. अशा परिस्थितीत आपण प्रतिबंध काढून टाकल्यास संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. संसर्ग जास्त असताना आपण निर्बंध दूर केल्यास, कोरोना झपाट्यानं पसरू शकतो.

डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रम प्रमुखांचं म्हणणं आहे की, लस आल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग कमी होईल याबाबत काही सांगता येऊ शकत नाही. गोवरसारख्या रोगांसाठी लस आहे. परंतु रोग संपलेला नाही. कोरोनाच्या १०० हून अधिक लसींवर काम सुरू आहे. परंतु ही लस फार प्रभावी असणं गरजेचं आहे. याशिवाय ही लस सर्वांसाठी सहज उपलब्ध असावी.

दरम्यान राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. गुरूवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  40 हजार 145 नमुन्यांपैकी 2  लाख 12 हजार 126 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  27 हजार  524 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 15  हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या 1हजार  19 आता  इतकी झाली आहे.

 गुरूवारी मृत पावलेल्या 44 नागरिकांमध्ये मुंबईतील  25, नवीमुंबई 10,  पुणे 5,  औरंगाबाद 2  कल्याण डोंबिवली 1 , पनवेल 1 अशी मृतांची संख्या आहे. गुरूवारी झालेल्या 44  मृत्यूमध्ये पुरूष 31 आणि 13, महिलांचा समावेश आहे. 


हेही वाचा

चिंताजनक! कोरोनाचे दिवसभरात 998 रुग्ण, 25 जणांचा बळी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा