Advertisement

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाच्या वापरावर WHOची तात्पुरती बंदी

... म्हणून कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली आहे.

हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधाच्या वापरावर WHOची तात्पुरती बंदी
SHARES

कोरोना उपचारासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली आहे. भारतात हे औषध मोठ्या प्रमाणावर मिळत असल्यानं भारतानं जगातल्या अनेक देशांना त्याचा पुरवठा केला होता. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचा जाहीरपणे पुरस्कारही केला होता.

या औषधाच्या वापराच्या निष्कर्षांचा आणि आकडेवारीचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानंतरच त्याच्या वापराबाबतच्या चांगल्या वाईट परिणामाबाबत काही माहिती जाहीर करता येऊ शकेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं.

तर काही दिवसांपूर्वीच भारतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या औषधाच्या वापरला मान्यता दिली होती. भारतात आणि जगातल्या काही देशांमध्ये मलेरियावर हे औषध वापरलं जातं.

सुरूवातीच्या काही प्रयोगांमध्ये हे औषध प्रभावी ठरल्याचं म्हटलं जात होतं. तर काहींनी त्याचा उलट परिणाम होत असल्याचंही म्हटलं होतं. मात्र कोरोनावर अजुन औषध सापडलं नसल्यानं या औषधाचा वापर करण्यात येत होता.

दरम्यान आता सिंगापूरच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कोव्हिड-19 रूग्ण ११ दिवसानंतर संसर्गजन्य नसतात, असं समोर आले आहेत. बहुतेक रूग्णांकडून संसर्ग होण्याचा धोका नगण्य आहे. सिंगापूरच्या नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्टीव्ह डिसीज अॅण्ड अ‍ॅकेडमी ऑफ मेडिसिन (Singapore’s National Centre for Infectious Diseases and the Academy of Medicine) यांनी संयुक्त संशोधनात असा दावा केला आहे.

संशोधकांनी रुग्णालयात दाखल केलेल्या ७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमधून संक्रमणाचा धोका किती आहे? याचा अभ्यास केला. यात असं दिसून आलं की लक्षणं उद्भवल्यानंतर सात दिवसांपर्यंत, व्हायरसची संख्या वाढण्याची आणि हवेत पसरण्याची शक्यता असते. मात्र आठव्या आणि दहाव्या दिवसात कमकुवत होतो आणि ११व्या दिवसापर्यंत हा धोका कमी होतो.



हेही वाचा

नातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती

फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर देण्याची गरज- मुख्यमंत्री

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा