तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या!

Mumbai
तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या!
तुमच्या फुफ्फुसांची काळजी घ्या!
See all
मुंबई  -  

मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. दरवर्षी जगामध्ये 1 लाख 80 हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात. भारतात सध्या दीड ते दोन कोटी अस्थमाचे रुग्ण आहेत. यात 5 ते 12 वर्षांच्या मुलांमध्ये 10 ते 15 टक्क्यांचे प्रमाण आहे. तसंच महिलांचं ही मोठं प्रमाण असल्याचं समोर आलंय. वजन घटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकदा जेवणात बरीच काटछाट केली जाते. परिणामी, पोषणमूल्यांचे प्रमाण कमी होते. यामुळे डॉक्टरांकडे दम्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वजन नियंत्रणात राहावे यासाठी मुली डाएट करतात, एकवेळ उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही, हे डॉक्टरांनी सांगूनही चांगला आहार घेतला जात नाही. त्यामुळे धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे, दम्याचा अॅटॅक येणे आदी तक्रारी वाढताना दिसत आहेत.

वाढत्या प्रदूषणासोबतच घरातील धूळ, धूम्रपान तसंच फटाक्यांचा धूरही अस्थमा (दमा) होण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो, त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. त्यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. हा एक विकार आहे, ज्यासाठी दीर्घकाळापर्यंत उपचार घेणं गरजेचं असतं.


यामुळे होऊ शकतो अस्थमा (दमा)


  • घरातील गादी, कार्पेट, इतर धूळ, मांजरांचे केस, झुरळ
  • घराबाहेरील परागकण
  • तंबाखूचा धूर, रासायनिक धूर
  • नाक, घसा आणि फुप्फुसातील जंतुसंसर्ग
  • वारंवार होणारी सर्दी
  • भावनिक उद्वेग, शारीरिक परिश्रम
  • आधुनिक शहरीकरण
  • जास्त हसल्यामुळे, तणावामुळे

महिलांच्या हार्मोन्सवर दम्याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान, अस्थिमज्जेतील एस्ट्रोजनचे प्रमाण प्रथिनांना सक्रिय करते आणि दम्याची लक्षणं दिसू लागतात. तसंच 40-45 वयातील महिलांची मासिक पाळी गेल्यानंतर दम्याची लक्षणं दिसून येतात. बाळाच्या जन्माच्या वेळी आईने धूम्रपान केलं तरी बाळाला दम्याचा त्रास होऊ शकतो. तसंच अनुवांशिकतेमुळे देखील बाळाला दमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लगेच जरी हा त्रास जाणवला नाही तरी भविष्यात हा त्रास होण्याची शक्यता असते.
- डॉ. इंदू बुबना, फुफ्फुस तज्ञ्ज

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.