Advertisement

राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन: योग्य उपचारांसोबतच 'त्यांना' हवीय आत्मीयता


राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन: योग्य उपचारांसोबतच 'त्यांना' हवीय आत्मीयता
SHARES

तुमच्या मुलाच्या स्नायूत सतत पेटके येत असतील किंवा त्याला एखादी गोष्ट समजण्यासाठी फार वेळ लागत असेल, तर त्याला सेरेब्रल पाल्सी हा आजार असू शकतो. हे ऐकून लगेच घाबरून जाऊ नका. योग्य वेळेत उपचार घेतले, तर हा आजार पटकन बरा देखील होऊ शकतो.  

राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिनाच्या पार्श्वभूमीवर या गंभीर आजारामुळे शरीरात काय व्यंग निर्माण होऊ शकतात, त्यामागची कारणे काय? याची माहिती करून देण्यासाठी मुंबईत चाईल्ड केअर फाऊंडेशनने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

भारतातील तब्बल २५ लाख व्यक्तींना सेरेब्रल पाल्सी या रोगानं त्रस्त केलं आहे. अचूक वेळेत निदान आणि योग्य उपचाराच्या आधारे 'नॉन-प्रोग्रेसिव्ह' प्रकारातील या आजारावर यशस्वीपणे मात करता येऊ शकते. त्यातूनच हा आजार जडलेली मुलं पुढे जाऊन स्वावलंबी होऊ शकतात.

सेरेब्रल पाल्सी हा आजार झालेल्या बहुतांश व्यक्तींची बुद्धिमत्ता सरासरीएवढी किंवा सरासरीपेक्षा किंचीत जास्त असते.


काय आहे सेरेब्रल पाल्सी आजार?

समन्वयाचा अभाव, मान धरण्यास, बसण्यास विलंब होणे, स्नायूंमध्ये पेटके येणे, स्नायू आखडणे ही सेरेब्रल पाल्सी आजाराची सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. याचं पटकन निदान करता येत नाही. हा आजार मेंदूवर देखील परिणाम करू शकतो. दोन्ही पायांच्या स्नायूंना येणारी सूज किंवा पेटके यामुळे मुलांना अपंगत्व येऊ शकते.

जागतिक आकडेवारीनुसार दर १००० बालकांमध्ये ३ मुलांना हा आजार आहे आणि भारतातही साधारण हेच प्रमाण आहे.


या आजाराबद्दल समाजात असंख्य गैरसमज असून समाजाने या आजाराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आधुनिक उपचारपद्धती, औषधं, फिजीओथेरपी आणि इतर उपकरणांचा वापर करून या रोगावर उपचार केले जातात. योग्य उपचारांद्वारे हा आजार झालेली व्यक्ती समाजात इतर व्यक्तींप्रमाणेच स्वावलंबी होऊन आपले योगदान देऊ शकते.

- डॉ. अशोक एन. जोहरी, संस्थापक, चाईल्ड केअर फाऊंडेशन


पारंपरिक उपचारपद्धतीत ‘सेरेब्रर पाल्सी’च्या रुग्णांवर फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कास्टिंग, गेटर्स, अँकल फूट ऑर्थोसिस आणि शस्त्रक्रिया करण्यात येते. पण, आता स्नायू ताठर झालेल्या रुग्णांना ‘बटुलिनम टॉक्सिन इंजक्शन’ देतात. ही अत्यंत परिणामकारक उपचार पद्धती समजली जाते. 

दिव्यांग व्यक्तींच्या हाडांच्या उतींमध्ये काही समस्या असू शकतात, पण आधुनिक उपचारपद्धती, औषधे, शस्त्रक्रिया आणि सहाय्यक उपकरणांमुळे या समस्यांचेही निराकरण होऊ शकते. ज्या मुलांचे स्वत:च्या स्नायूंवर नियंत्रण नसते किंवा ज्यांना गतिमंद समजले जाते, अशा बालकांचीही दखल घेऊन समाजाने त्यांना चांगली वागणूक देणे गरजेचे असते.

- डॉ. रत्न महेश्वरी, बालअस्थिरोगशल्य विशारद


हेही वाचा - 

तुम्हाला आहे का विसरण्याचा आजार?

काय आहे स्क्रिझोफ्रेनिया? जाणून घ्या...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा