Advertisement

काय आहे स्क्रिझोफ्रेनिया? जाणून घ्या...


काय आहे स्क्रिझोफ्रेनिया? जाणून घ्या...
SHARES

जेवढे आपलं आयुष्य फास्ट झालंय, तितक्याच वेगाने आपल्याला आजार जडायला लागलेत. मग ते शारीरिक असो की मानसिक...त्यातही डोळ्यांना न दिसणाऱ्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. मधुमेह यात तर महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. पण, आता यांच्यासोबतीला मानसिक आजार ही बळावले आहेत.

त्यातला एक मानसिक आजार म्हणजे स्क्रिझोफ्रेनिया...याच आजाराच्या जाळ्यात अडकून एका मुलाने आपल्या वडिलांवर हल्ला केल्याची घटना मुंबईत घडली आहे. त्या मुलाच्या वडिलांवर सध्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मुलाच्या बहिणीनेच त्याला स्क्रिझोफ्रेनियाचा आजार असल्याचं मुंबई लाइव्हशी बोलताना कबूल केलं. याव्यतिरिक्त त्याच्या डॉक्टरांनीही काही वर्षांपूर्वी त्याला स्क्रिझोफ्रेनिया हा आजार असल्याचं सांगितलं होतं.

या मुलाच्या कुटुंबियांनी त्याचा रागावर नियंत्रण नसल्याकारणाने डॉक्टरांकडे नेलं होतं. त्यावेळी त्याला स्क्रिझोफ्रेनिया हा मानसिक आजार असल्याचं निदान केलं होतं. पण, याच गुरुवारी त्या मुलाने रागावर कंट्रोल न राहिल्यामुळे आपल्या वडिलांवर हल्ला केल्याचं त्याच्या बहिणीने सांगितलं. ही माहिती त्याच्या बहिणीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.


ण, नेमकं स्क्रिझोफ्रेनिया म्हणजे काय ?

  • स्क्रिझोफ्रेनियाला मूड डिसऑर्डर्स असंही म्हणतात
  • हा आजार मेजर डिप्रेशन किंवा गंभीर मानसिक आजारांमध्ये मोडतो
  • मेंदूच्या रसायनातील (न्यूरोट्रान्स) च्या बिघाडामुळे हा आजार होतो
  • त्यासोबतच सिटोटोनिन या रसायनाचं प्रमाण देखील बदललेलं पाहायला मिळतं.
  • रुग्णांच्या भावना, वागणूक आणि विचार करण्याच्या मानसिकतेत दोष निर्माण होतो
  • हा आजार पुरूषांमध्ये १५ ते ३५ या वयात तर स्त्रियांमध्ये २० ते ३० वयामध्ये दिसून येतो
  • रुग्णांचा स्वतःच्या मनावरील ताबा सुटतो
  • भावनेत, विचारातदेखील मर्यादा राहत नाही
  • तो असंमजस वागतो, बोलतो, कृती करतो
  • त्यांना सतत भास होतात

समाजात यांचं वागणं संशयास्पद नसतं. पण, एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडली तर ते लोक बिघडतात. त्यात त्यांच्या हातून काहीतरी चूकीचं घडू शकतं.




स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणं ?

  • स्वतः विचार करू शकत नाही
  • काल्पनिक आयुष्यात जगू लागणे
  • चिडचिडेपणा वाढणे
  • संशयी वृत्तीत वाढ होणे
  • विचित्र आवाज ऐकू येण्याचा भास होणे
  • निराश आणि निरूत्साही होणे
  • कधी-कधी मनावरील ताबा सोडल्याने हिंसक होणे

ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दिवसाला जवळपास स्क्रिझोफ्रेनियाचे १६० ते १७० पेशंट उपचारांसाठी येतात, अशी माहिती तिथल्या डॉक्टरांनी दिली. देशात १०० रुग्णांमागे एक हा स्क्रिझोफ्रेनियाचा रुग्ण असतो. हा आजार पटकन कळून येत नसल्याने पालकांनाही अनेकदा कल्पना येत नाही. 


जवळपास दिवसाला माझ्याकडे 10 रुग्ण फक्त स्क्रिझोफ्रेनियाचे येतात. स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रुग्णाला सतत संशय येत असतो कू त्याच्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे. त्याला संशयवृत्ती जडते. असा रुग्ण स्वत:ला नाहीतर दुसऱ्याला हानी पोहचवू शकतो.

डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ


हेही वाचा - 

मानसिक आजारानं त्रस्त आहात? 'वन रुपी क्लिनिक'मध्ये या...

बेघर मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संघटनांचा पुढाकार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा