Advertisement

'डिस्चार्ज घेऊन आम्ही जायचं कुठे?' घाटकोपर इमारत दुर्घटनाग्रस्तांचा सवाल


'डिस्चार्ज घेऊन आम्ही जायचं कुठे?' घाटकोपर इमारत दुर्घटनाग्रस्तांचा सवाल
SHARES

घाटकोपरमधील साई सिद्धी इमारत दुर्घटनेला तीन दिवस लोटल्यानंतर हरवलेल्या माणसांचा शोध संपला आहे, पण आता हरवलेल्या घरांचा शोध सुरु झाला आहे. प्रत्येक मजल्यावर तीन असे या इमारतीमध्ये एकूण 12 फ्लॅट होते.


घराची झाली माती...

अवघ्या काही सेकंदांमध्ये हे 12 फ्लॅट मातीचा ढिगारा झाले. 17 जणांवर काळाने घाला घातला, तर अनेक संसार उध्वस्त झाले. पण जे सुदैवाने या दुर्दैवी दुर्घटनेतून बचावले, त्यांचा आता जगण्यासाठी लढा सुरु झाला आहे. कारण सरकारी मदत तातपुरती महत्त्वाची ठरत असली, तरी त्या मदतीतून गेलेलं घर परत येणार नाही. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांवर आता 'कुणी घर देता का घर?' असं म्हणायची वेळ आली आहे.


डिस्चार्ज घेऊन जायचं कुठे?

साई सिद्धीमध्ये चौथ्या मजल्यावर गीता रामचंदानी त्यांच्या स्वत:च्या घरात रहात होत्या. दुर्घटना घडली, तेव्हा त्याही जखमी झाल्या. त्यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचारही सुरु आहेत. मात्र या दुर्घटनेमध्ये हक्काच्या घराचीच माती झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तरी रहायचं कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.


या मदतीतून घर येणार का?

सध्या गीता यांचे पती लालचंदन रामचंदानी हे गीता यांच्या बहिणीकडे वाशीला राहत आहेत. पण, आता रामचंदानी कुटुंबाचे हक्काचे घर आता राहिले नसून ते बेघर झाले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, अपंगत्व आलेल्यांना 2 लाख आणि जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार उचलेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र ही मदत हक्काच्या घरासाठी अपुरी असल्याचं रामचंदानी कुटुंबियांचं म्हणणं आहे.


इमारतीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर हवे असून या २-५ लाखात काहीही होणार नाही. त्यामुळे सरकारने आम्हाला आमचे हक्काचे घर मिळवून द्यावे. तसेच, सरकारने दुर्घटनेतील व्यक्तीसाठी सध्या कुठेच राहण्याची सोय केली नसून प्रत्येक व्यक्ती ही आपल्या नातेवाईकांकडे राहत आहे.

मनिष रामचंदानी, गीता रामचंदानी यांचा मुलगाहेही वाचा

ढिगाऱ्याखालून परतलेल्या 'वर्षा'ची कहाणी!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement