Advertisement

एका मोबाईलने वाचवला जीव!


एका मोबाईलने वाचवला जीव!
SHARES

घाटकोपर साईदर्शन इमारत दुर्घटनेत 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले. अवघ्या काही सेकंदांच्या अंतरात चार मजल्यांची ती इमारत मलब्याचा ढिगारा झाली. आणि त्याखाली दबले गेले अनेक जीव. काहीचं दैव बलवत्तर होतं म्हणून ते वाचले, मात्र त्या 17 जणांना जीव मात्र वाचू शकला नाही. जे वाचले, त्यांनी कथन केलेला घटनाक्रम अंगावर शहारे आणणारा आहे. राजेश दोशी त्यातलेच एक!


कुठे अडकले राजेश दोशी?

मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीच्या दुस-या मजल्यावरील राजेश दोशी, त्यांची पत्नी रिटा आणि मुलगा दर्शन असे तीन जणांचे कुंटुंब रहात होते. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळपासूनच बचाव पथक ढिगा-याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम करत होते. पण राजेश दोशी यांचा कुठेच पत्ता नव्हता. त्यांचं कुटुंब चिंतेत होतं.

सकाळीच दोशी यांच्या पत्नी मंदिरात गेल्या होत्या. त्यांचा मुलगा त्यांना सोडण्यासाठी म्हणून घराबाहेर होता. दोशी यांना मधुमेह असून त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते घरीच आराम करत होते. पत्नी आणि मुलगा घरी नसताना आणि दोशी बेडवर झोपले असताना अचानक काही कळायच्या आतच मोठा आवाज झाला आणि इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.


मोबाईलमुळे वाचला जीव!

संध्याकाळपर्यंत राजेश दोशींचा काहीही थांगपत्ता लागला नसल्यामुळे त्यांचं कुटुंब चिंतेत होतं. सुमारे पाच वाजेच्या सुमारास अचानक मुलगा दर्शनच्या मोबाईलवर स्वत: राजेश दोशी यांचाच फोन आला. सर्वांचेच चेहरे आश्चर्य आणि काळजीने भरले. फोनवर स्वत: राजेश दोशी बोलत होते. इमारत कोसळली तेव्हा नेमका राजेश दोशी यांच्या हातात मोबाईल होता. त्यामुळे त्यांनी मुलाला फोन करुन आपण ढिगाऱ्याखाली अडकलो असल्याचं सांगितलं.

फोन आल्यानंतर मुलगा दर्शन आणि पत्नी रिटा यांच्या आनंदाला सीमाच राहिल्या नाही. बचाव पथकानं लागलीच काम सुरु केलं. श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. शेवटी इमारत दुर्घटनेनंतर तब्बल 10 तासांनंतर राजेश दोशी यांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं, अशी माहिती बचाव पथक कर्मचाली पंकज जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

मध्य रात्री २ वाजता दोशी यांना जवळच्याच शांतीनिकेतन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे शांतीनिकेत रुग्णालयातील डॉ. प्रफुल्ल लोखंडे यांनी सांगितले. मात्र 'देव तारी त्याला कोण मारी?' या म्हणीचा प्रत्यय राजेश दोशी यांच्याबाबतीत अगदी तंतोतंत आला असंच म्हणावं लागेल!



हेही वाचा

ढिगाऱ्याखालून परतलेल्या 'वर्षा'ची कहाणी!

हक्काचं छप्पर धाडकन् कोसळतं तेव्हा...


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा