Advertisement

६ महिन्यानंतरही 'एक्स-रे' कक्ष बंद


६ महिन्यानंतरही 'एक्स-रे' कक्ष बंद
SHARES

बोरीवलीतील मागाठाणे परिसरातील माता व बालक रुग्णालयातील 'एक्स-रे' कक्ष गेल्या ६ महिन्यांपासून बंद आहे. या रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिल चोपडे यांनी सप्टेंबर महिन्यात हे कक्ष सुरु होईल, असं आश्वासन दिलं होतं. पण, त्यांनी केलेला दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.

'एक्स-रे' कक्ष अद्याप बंद असल्यानं येथे तपासणीसाठी येणाऱ्या मातांना त्याचा अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. येथे 'एक्स-रे' काढण्यासाठी येणाऱ्या महिलांना शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. तरीही गेल्या ६ महिन्यांपासून रुग्णालय प्रशासन 'एक्स-रे' टेक्निशिअन आजारी असल्याचं कारण देत आहे.


मी या रुग्णालयात १ सप्टेंबरपासून रुजू झालो आहे. त्यामुळं 'एक्स-रे' कक्ष कधीपासून आणि का बंद आहे, याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली नाही. तरीही हा विभाग लवकरात लवकर सुरू करण्याचा माझा प्रयत्न असेल.
- डॉ. प्रमोद नगरकर, वैद्यकीय अधिक्षक, माता व बालक रुग्णालय, बोरीवली

या रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिल चोपडे यांनी दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरपर्यंत 'एक्स-रे' कक्ष सुरू करु, असा दावा केला होता. पण, डॉ. चोपडे निवृत्त झाल्यामुळं या रुग्णालयाची जबाबदारी डॉ. नगरकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या 'एक्स-रे' टेक्निशिअनसाठी डॉ. नगरकर यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

या रुग्णालयात दिवसाला अंदाजे ६० महिला तपासणीसाठी येतात. डॉक्टरांनी 'एक्स-रे' काढण्यास सांगितल्यास संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात 'एक्स-रे' काढण्यासाठी जावं लागतं. त्यात जवळपास अर्धा तास जातो, अशी प्रतिक्रिया रुग्णालयात येणाऱ्या मातांनी दिली.



हे देखील वाचा -

जे.जे रुग्णालयात पहिली यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

'तिनं' गिळले ७५० ग्रॅम केस!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा