अखेर शताब्दी रुग्णालयाला मिळाले भूलतज्ज्ञ

  Kandiwali (W)
  अखेर शताब्दी रुग्णालयाला मिळाले भूलतज्ज्ञ
  मुंबई  -  

  दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शताब्दी रुग्णालयाला भूलतज्ज्ञ मिळाले आहेत. कांदिवली पश्चिमेकडील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालय अर्थात शताब्दी रुग्णालयात अनेक महिन्यांपासून भूलतज्ज्ञच नाहीत, अशी बातमी ‘मुंबई लाइव्ह’ने केली होती. त्या बातमीचा 'मुंबई लाइव्ह'ने सतत पाठपुरावा केला. 

  रुग्णालयात 15 दिवसांपूर्वी भूलतज्ज्ञ कामावर रुजू झाले असल्याची माहिती शताब्दी रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रदीप आंग्रे यांनी दिली आहे.


  भूलतज्ज्ञांसाठी शोध मोहीम

  रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया इथे केली जात नव्हती. 2 महिन्यांपूर्वी मेट्रो 7 च्या बॅरिकेड्समुळे एका स्कूटरचालकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. पण, रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाही, हे कारण देऊन त्यांना नायर रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. त्याचवेळी शताब्दी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याचं उघड झाले. अखेर भूलतज्ज्ञांसाठी सुरू असलेला शोध संपला आणि पंधरा दिवसांपूर्वी शताब्दी रुग्णालयात भूलतज्ज्ञ रुजू झाले आहेत. 

  नवीन भूलतज्ज्ञांसाठी सिद्धार्थ रुग्णालयात प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार सिद्धार्थ रुग्णालयातूनच हे नवीन भूलतज्ज्ञ आता शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसंच याविषयी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता अविनाश सुपे यांच्याशीदेखील संपर्क करण्यात आला होता.


  गेल्या 2 महिन्यांपासून शताब्दी रुग्णालयात भूलतज्ज्ञ नव्हते. पण, आता 15 दिवस झाले आम्ही नवीन भूलतज्ज्ञांची व्यवस्था केली आहे. ते कामावर रुजू झाले आहेत. आम्ही सिद्धार्थ रुग्णालयातून हे 4 नवीन भूलतज्ज्ञ आणले आहेत. एकूण 7 भूलतज्ज्ञांची एका रुग्णालयात गरज असते. आम्हाला अजून 3 कमी पडत आहेत.पण, ते ही आता आठवड्यापासून कामावर रुजू होणार आहेत. 

  डॉ. प्रदीप आंग्रे, उपवैद्यकीय अधिक्षक, शताब्दी रुग्णालय

  आधी शताब्दी रुग्णालयात दर दिवशी किमान 20 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात असे. पण भूलतज्ज्ञ नसल्यामुळे नंतरच्या काळात परिस्थिती बदलली. अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जाऊ लागले. भूलतज्ज्ञ रुजू झाल्यामुले डॉक्टरांनाही दिलासा मिळाला आहे. आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाची शस्त्रक्रिया करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. पण, अशा वेळी रुग्णांना आम्हाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवावे लागत होते. आता तसे होणार नाही, या शब्दांत डॉ. प्रदीप आंग्रे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना समाधान व्यक्त केले. 
  हेही वाचा

  नायर रुग्णालयात उपचारांसाठी उपकरणंच नाहीत!

  मुंबईकरांच्या मानगुटावर स्वाईन-फ्लू आणि लेप्टोचं भूत!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.