Advertisement

महाराष्ट्रात झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, लक्षणांपासून ते उपचारापर्यंत जाणून घ्या सर्व काही

नेमका हा व्हायरस कसा पसरतो? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार काय? हे जाणून घेऊयात.

महाराष्ट्रात झिका व्हायरसचा रुग्ण आढळला, लक्षणांपासून ते उपचारापर्यंत जाणून घ्या सर्व काही
SHARES

कोरोनानंतर झिका व्हायरसचा धोका महाराष्ट्रावर घोंघावत आहे. झिका व्हायरसचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा एक रुग्ण आढळला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे. केरळमध्ये झिका व्हायरसची १४ रुग्ण आढळून आले आहेत. नेमका हा व्हायरस कसा पसरतो? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार काय? हे जाणून घेऊयात.

झिका व्हायरस ‘असा’ पसरतो

झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. प्रामुख्यानं हा व्हायरस डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिक संबंधामार्फतही होत असल्याचं दिसून आलं आहे.

व्हायरसचा काय परिणाम होतो?

व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात.

या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसंच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?

झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात.

  • हलकासा ताप
  • डोळे लाल होणे आणि सुजणे
  • डोकेदुखी
  • पायांचे गुडघेदुखी
  • शरीरावर लाल चट्टे येणे

झिका व्हायरस पहिल्यांदा कुठे आढळला?

झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलात आढळून आला होता. त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं. १९५२ साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.

संशोधकांच्या मते भारतातील नागरिक मोठ्या संख्येनं कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. १९६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३३ रुग्णांमध्ये झिका व्हायरसबाबत प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं सांगितलं जातं.

झिकावर औषध आहे का?

आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.



हेही वाचा

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस चाचण्या

होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक– राजेश टोपे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा