लाॅकडाऊनमध्ये पाडणार 'हा' १८७ वर्षे जुना ऐतिहासिक पूल

एक्स्प्रेस वे वरील अवजड वाहनांना या पुलाचा नेहमीच अडथळा होत असल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

लाॅकडाऊनमध्ये पाडणार 'हा' १८७ वर्षे जुना ऐतिहासिक पूल
SHARES

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (mumbai pune express way) वरील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला तसंच अमृतांजन (amrutanjan bridge) या नावाने प्रसिद्ध असलेला खंडाळ्याजवळील पूल लाॅकडाऊनची संधी साधून पाडण्यात येणार आहे. एक्स्प्रेस वे वरील अवजड वाहनांना या पुलाचा नेहमीच अडथळा होत असल्याने हा पूल पाडण्यात येणार आहे. या पाडकामासाठी एक्स्प्रेस वे वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. 

हेही वाचा- संचार बंदीच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या दीड हजार नागरिकांवर गुन्हे

‘असं’ पडलं अमृतांजन नाव

मुंबई-पुणे या जुन्या महामार्गावरील (khandala vally) खंडाळा घाटात हा पूल आहे. काही वास्तूतज्ज्ञांच्या मते हा पूल म्हणजे बोर घाटाच्या आठवणी प्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी बोर घाटात रस्ता बांधण्यात आला होता. त्याची आठवण म्हणून या घाटात ही कमान बांधण्यात आली होती. १० नोव्हेंबर १८३० साली हा रस्ता व्यापारासाठी खुला करण्यात आल्याची माहिती या कमानीवर कोरण्यात आली आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकीर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या रस्त्याचं बांधकाम केल्याचं त्यावर उल्लेख आहे. या रस्त्यावर मोठी रहदारी सुरू झाल्यावर काही वर्षांपूर्वी अमृतांजन कंपनीची एक जाहिरात या कमानीवर लावण्यात आली होती. तेव्हापासून या पूलाला अमृतांजन पूल अशी ओळख मिळाली होती.  

‘असा’ तोडणार पूल

परंतु एक्स्प्रेस वे (express way) वरून जाणाऱ्या अवजड वाहनांना या कमानीचा अडथळा होत असल्याने ही कमान तोडण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला होता. त्यानुसार पूल पाडण्याचं नियोजन सुरु असलं, तरी प्रचंड वाहतुकीमुळे हे शक्य होत नव्हतं. परंतु सध्या लाॅकडाऊनमुळे (lockdown) एक्स्प्रेस वे वरील वाहतूक मंदावल्याने महामंडळाने या संधीचा फायदा घेत कमान तोडण्याचं ठरवलं आहे. ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात नियंत्रित स्फोटकांचा वापर करुन ही कमान तोडण्यात येईल. या दरम्यान एक्स्प्रेस वे वरील वाहतूक जुन्या महामार्गावरुन १० किमी अंतरावरुन वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- धारावीतील २५०० लोक होम क्वारंटाइन

‘अशी’ वळवणार वाहतूक

या कामामुळे ४ ते १४ एप्रिल दरम्यान मुंबई ते पुणे मार्गावरील वाहतूक अंडा पॉईंट इथून  जुन्या महामार्गावरुन खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळ एक्झिटपर्यंत होईल, तर पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक लोणावळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावरुन लोणावळ-खंडाळामार्गे अंडा पॉईंटपर्यंत वळविण्यात येईल.

संबंधित विषय