Advertisement

मेट्रो-२ 'ब' चा कारडेपो बांधण्यासाठी ८ कंपन्यांच्या उड्या


मेट्रो-२ 'ब' चा कारडेपो बांधण्यासाठी ८ कंपन्यांच्या उड्या
SHARES

डी. एन. नगर ते मंडाळे या मेट्रो-२ 'ब' प्रकल्पासाठी मंडाले येथे कारडेपो बांधण्यात येणार आहे. या मंडाले कारडेपोच्या बांधकामसााठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ८ कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे या ८ कंपन्यांमध्ये आता कारडेपोसाठी स्पर्धा असणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ला एकूण २३.५ किमी मार्गाच्या मेट्रो-२ 'ब'चं काम शक्य तितक्या लवकर सुरू करायचं आहे. कारण २०२१ पर्यंत हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा 'एमएमआरडीए'चा मानस आहे.

काही महिन्यांपूर्वी 'एमएमआरडीए'ने मेट्रो-२ 'ब' मधील २२ मेट्रो स्थानकापैकी ११ मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी निविदा मागवल्या होत्या. पण निविदा सादर केलेल्या तिन्ही कंपन्यांनी अधिकची बोली लावल्याने 'एमएमआरडीए'ने निविदाच रद्द केली. त्यानुसार पुन्हा या ११ मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.

मेट्रो स्थानकाच्या बांधकामासाठी निविदेचं काम मार्गी लावतानाच 'एमएमआरडीए'ने मंडाले कारडेपोसाठीही निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून निविदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लवकरच या निविदांची छाननी करत एका कंपनीची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या ८ कंपन्यांमधून कोण बाजी मारतं आणि मंडाले कारडेपोचं काम कोणाला मिळतं, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.


८ कंपन्या अशा


१) मे. सॅम (इंडिया) बिल्ट वेल प्रायव्हेट लिमिटेड आणि मे. एआय फारास इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि.
२) मे. जेएमसी प्रोजेक्टस (इंडिया) लि.
३) मे. रेलकाॅम इन्फ्राप्रोजेक्टस लि. आणि मे. अश्विनी इन्फ्राडेव्हेल्पमेन्टस प्रा. लि.
४) मे. अहलुवालिया काॅन्स्टॅक्टस (इंडिया) लि.
५) मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
६) मे. एनसीसी लि.
७) मे. एमबीझेड आणि मे. आरसीसी इन्फ्रा वेंचर
८) मे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.हेही वाचा-

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा