Advertisement

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!


मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!
SHARES

लोकल ट्रेन असो वा अत्याधुनिक मेट्रोचा वापर करण्यासाठी प्रवाशांना लांबलचक रांगेत ताटकळत उभं राहूनच तिकीट काढवं लागतं. लोकलच्या प्रवाशांची या रांगेतून सुटका होईल की नाही हे माहीत नाही; पण मेट्रो प्रवाशांची मात्र रांगेतून सुटका झाली आहे. 'मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड' (एमएमओपीएल)ने मेट्रो प्रवाशांना 'स्किप क्यू' प्रणाली अंतर्गत मोबाईलवर तिकीट उपलब्ध देत रांगेच्या समस्येवर मात केली आहे.


सेवेला सुरूवात

मेट्रोच्या 'स्किप क्यू' सेवेला गुरूवारपासून सुरूवात करण्यात आली. 'एमएमओपीएल'ने पेटीएमच्या मदतीने 'स्किप क्यू' सेवा सुरू केली असून हे तिकीट मेट्रो प्रवाशाला 'रीडलर' अॅपद्वारे मोबाईलवर उपलब्ध झालं, तर शुक्रवारपासून हे तिकीट 'पेटीएम' अॅपवर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती 'एमएमओपीएल'कडून देण्यात आली आहे.


मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी 'स्किप क्यू' सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना स्मार्टफोनवरून घरबसल्या तिकीट काढता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. 'स्किप क्यू'ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल.

- अभयकुमार मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमओपीएल



देशातील पहिली सेवा

'स्किप क्यू'च्या माध्यमातून 'एमएमओपीएल'ने सुरू केलेली मोबाईल सेवा ही देशातील पहिली मोबाईल सेवा असल्याचा दावाही 'एमएमओपीएल'ने केला आला आहे. तर या सेवेद्वारे तिकीटाबरोबरच पासचं नूतनीकरणही होणार आहे.




असं काढा मोबाईल तिकीट

  • तुमच्या मोबाईलमध्ये जुनं पेटीएम अॅप असेल तर ते अनइन्स्टाॅल करत https://tinyurl.com/metrolaunch वरून नवं पेटीएम अॅप स्किप क्यू (क्यू आर तिकीट) सह इन्स्टाॅल करा.
  • अॅप इन्स्टाॅल झाल्यानंतर माय प्रोफाईलमध्ये जात आपला इमेल आयडी त्यात टाकून व्हेरीफिकेशन करून घ्या.
  • त्यानंतर मेट्रो आयकाॅनवर क्लिक करूत रिचार्ज किंवा पे बिल्सवर जा आणि मुंबई मेट्रो, मेट्रो आॅपरेटरचा पर्याय निवडा.
  • मग पुढे मेट्रो क्यू आर तिकिटीचा पर्याय निवडत कुठून कुठे प्रवास करायचा आणि किती प्रवाशांसाठी तिकीट हवं आहे तसंच एकेरी प्रवास करायचा आहे की परतीचा असे सर्व पर्याय व्यवस्थितरित्या नमूद करा.
  • पुढे प्रोसेस बटनवर क्लिक करत पुढे ई-पेमेन्टची प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर क्यू आर तिकीट तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल.
  • मेट्रो स्थानकावर पोहचल्यानंतर मोबाईल तिकीटवर क्लिक केल्यानंतर क्यू आर कोड येईल. हा कोड अॅटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटवर स्कॅन केल्यास गेटचा दरवाजा उघडेल आणि प्रवाशांना मेट्रोचा प्रवास करता येईल.



हेही वाचा-

'असा' आहे ठाणे-कल्याण-भिवंडीचा सुपरफास्ट मेट्रो मार्ग


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा