Advertisement

मेट्रोचं कारशेड आरेमध्येच का?


SHARES

गोरेगाव- मेट्रो 3चं कारशेड आरेमध्ये बनवण्याचा निर्णय झाल्यापासूनच यावर वाद सुरु झाला. मात्र आता या प्रकरणात नवी माहिती उजेडात आली आहे. आरेच्या 33 हेक्टर जागेपैकी अवघ्या काही एकर जागेत कारशेड आणि उर्वरित जागेचा व्यावसायिकदृष्ट्या विकास केला जाणार आहे. एवढंच नाही तर मोकळ्या जागेवर अधिकाधिक बांधकाम करता यावं यासाठी 3 एफएसआयही मिळवण्यात आलाय. माहिती अधिकारातून हा प्रकार उघड झालाय.

खरंतर मेट्रो 3 च्या कारशेडसाठी मुळात कांजुरमार्गच्या जागेला सरकारने हिरवा कंदील दिला होता. पण, वाद असल्याचं दाखवत एमएमआरसीनं कांजुरमार्गची जागा नाकारली. शिवाय मेट्रो-1 साठी फक्त 17 हेक्टर जागा लागली असताना मेट्रो-3 साठी मात्र 33 हेक्टर जागा कशासाठी असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. ‘मुंबई लाईव्ह’ने एमएमआरसीकडे याविषयी विचारणा केली असता मात्र सारवासारवीचीच उत्तरं देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा