Advertisement

'परे'च्या प्रवाशांसाठी अच्छे दिन


'परे'च्या प्रवाशांसाठी अच्छे दिन
SHARES

पश्चिम रेल्वेने प्रवास करणे आता आणखी सोपे होणार आहे. प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे. नव्या लिफ्ट, एलिव्हेटेड डेक, सरकते जिने, बुकिंग कार्यालय, आरक्षण केंद्र, पादचारी पूल, स्कायवॉक, प्रवासी शौचालय या सुविधांनी पश्चिम रेल्वे स्थानकांचे रूप बदलणार आहे. पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वतीने मंगळवारी परे वरील बहुतांश स्थानकांवर विविध प्रवासी सुविधांचे लोकार्पण रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

लोकार्पण सोहळ्याची सुरुवात बोरिवली स्थानकापासून होणार आहेे. पश्चिम रेल्वेवरील दादर, अंधेरी, बोरिवली ही प्रचंड गर्दी असणारे स्थानके आहेत. पश्चिम रेल्वेवर सुमारे 35 लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांची संख्या 7.5 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे लवकरच महिला प्रवाशांना अनेक सुविधा देण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठीच्या सुविधा
1) बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर एलिव्हेटेड डेक आणि लिफ्ट बसवली जाणार
2) दादर, माटुंगा रोड आणि भाईंदर स्थाकावर नवीन पादचारी पूल
3) अंधरी येथील मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाला जोडणारा स्कायवॉक
4) दादर, भाईदंर, वसई रोड स्थानकांवर एलिव्हेटेड बुकिंग कार्यालय
5) कांदिवली स्थानकावर बुकिंग कार्यालय
6) नालासोपारा स्थानक येथे नवीन प्रवासी आरक्षण केंद्र
7) गोरेगांव आणि कांदिवली स्थानकांवर नवीन शौचालय ब्लॉकचे उद्घाटन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा