Advertisement

आता, वर्सोवा ते विरार सी लिंक ?

मुंबईकर-विरारकरांसाठी हा प्रवास अडचणीचा ठरतो. हीच अडचण दूर करत वर्सोवा ते विरार अंतर कमी करण्यासाठी 'एमएसआरडीसी'नं वर्सोवा ते विरार सी लिंकचा विचार सुरू केला आहे. हा प्रकल्प करणं शक्य आहे का यासंबंधीचा व्यवहार्यता तपासणी अभ्यास लवकरच 'एमएसआरडीसी'कडून करण्यात येणार आहे.

आता, वर्सोवा ते विरार सी लिंक ?
SHARES

रेल्वे असो वा रस्ते मार्गानं विरारला जाणं म्हणजे मोठं दिव्यच. वर्सोवा ते विरार हे ६२ किमीचं अंतर पार करण्यासाठी सध्या अडीच तास वाया घालवावे लागतात. पण हेच अंतर काही मिनिटांत पार होईल, असं म्हटलं तर अनेकांना खरं वाटणार नाही. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकते. कारण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ने वर्सोवा ते वांद्रे सी लिंकचा विस्तार विरारपर्यंत करता येतो का याची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार वर्सोवा ते विरार सी लिंकची व्यवहार्यता तपासण्यात येणार असल्याची माहिती 'एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.


म्हणून विस्ताराचा विचार

पश्चिम द्रूतगती मार्गानं आणि राष्ट्रीय महामार्गाने वर्सोवा ते विरार हे ६२ किमीचं अंतर पार करण्यासाठी साधारणत: २ तास ३१ मिनिटं लागतात. गर्दीच्या वेळेस तर हे अंतर पार करण्यासाठी तीन-साडेतीन तासही लागतात. त्यामुळे मुंबईकर-विरारकरांसाठी हा प्रवास अडचणीचा ठरतो. हीच अडचण दूर करत वर्सोवा ते विरार अंतर कमी करण्यासाठी 'एमएसआरडीसी'नं वर्सोवा ते विरार सी लिंकचा विचार सुरू केला आहे. हा प्रकल्प करणं शक्य आहे का यासंबंधीचा व्यवहार्यता तपासणी अभ्यास लवकरच 'एमएसआरडीसी'कडून करण्यात येणार आहे. हा प्रकल्प व्यवहार्य ठरला तरच प्रकल्प पुढे जाणार आहे, असं एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड यांनी सांगितलं.


अधिकृत घोषणा

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्प दूर असला तरी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्प मात्र आता दृष्टीक्षेपात आला आहे. कारण या प्रकल्पाच्या बांधकामाला आता महिन्याभरात सुरूवात होणार आहे. 'एमएसआरडीसी'कडून यासंबंधीची अधिकृत घोषणा मंगळवारी एका पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

आॅक्टोबरमध्ये या कामाला सुरूवात होणार असून २०२३ पर्यंत सी लिंकचं काम पूर्ण करण्याचा 'एमएसआरडीसी'चा मानस आहे. १७ किमी अंतराच्या या सी लिंकचं बांधकाम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड इटालियन पार्टनर अॅस्टाल्डी कंपनीकडून करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ७००० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यास हे अतंर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार आहे.



हेही वाचा-

सागरी सेतूचे बांधकाम १ महिन्याच्या अात सुरू करा - मुख्यमंत्री

याचिकाकर्त्यांनी १० हजार कोटी न्यायालयात जमा करावे - एमएमआरडीए



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा