नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्ट सज्ज


SHARE

कुलाबा - नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टनं खास बससेवा सुरू केलीय. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी आणि मुबंईतील इतर समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी फिरायला जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी एकूण 17 जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी चर्चगेट स्थानक पूर्व आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस असा अनेक ठिकाणी वाहतूक अधिकारी बसनिरिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. 31 डिसेंबरला प्रवाशांची गैरसोय होणार नाही असं बेस्ट जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी सागितलं.

जादा गाड्यांचे बस क्रमांक आणि मार्ग

111 सी एस टी
112 गेट वे ऑफ इंडिया
203 जुहू बीच (दहिसर)
231 जुहू बीच (सांताक्रुज)

संबंधित विषय
ताज्या बातम्या