शिवडीत शौचालयाचं भूमिपूजन


  • शिवडीत शौचालयाचं भूमिपूजन
  • शिवडीत शौचालयाचं भूमिपूजन
  • शिवडीत शौचालयाचं भूमिपूजन
SHARE

शिवडी - जागतिक शौचालय दिनानिमित्त शिवडी पूर्वेकडील अमनशांतीनगर येथे सार्वजनिक शौचालय बांधलं जाणार आहे. आमदार अजय चौधरी आणि महापालिका एफ दक्षिण विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे भूमिपूजन 19 नोव्हेंबरला करण्यात आलं. या वेळी महापालिका एफ-दक्षिण सहायक आयुक्त विश्वास मोटे, नगरसेविका ममता चेंबूरकर, श्वेता राणे, शाखाप्रमुख विजय म्हात्रे, उपशाखा प्रमुख रुपेश ढेरंगे आणि पालिका अधिकारी उपस्थित होते.

या ठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून शौचालय नसल्यानं येथील नागरिकांना उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकावा लागत होता. त्यामुळे येथील परिसरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली. मात्र शिवडीतील अमनशांतीनगर हा परिसर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत येत असल्यानं येथे अनधिकृतपणे वास्तव्य करत असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याची परवानगी मिळत नव्हती. पण स्वच्छ भारत अभियान या उपक्रमामुळे एक वर्षातच येथे शौचालय उभारण्याची परवानगी मिळाली असल्याचं महापालिका एफ - दक्षिण आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या