Advertisement

गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० बेड्सची सुविधा

नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३७०० बेड इतकी झाली आहे. नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये २२०० बेड कार्यान्वित करण्यात आले होते.

गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये आणखी १५०० बेड्सची सुविधा
(File Image)
SHARES

गोरेगावमधील मुंबई महापालिकेच्या नेस्को जम्बो कोविड सेंटरमध्ये अतिरिक्त १५०० बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. होणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी बेड्स वाढवण्यात आले आहेत. या १५०० मधील १ हजार ऑक्सिजन बेड्स असणार आहेत

नेस्को मैदानावरील भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱ्या टप्प्यातील १ हजार ५०० बेड्सचं लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्तं करण्यात आले.  नेस्को कोविड केंद्राची क्षमता आता ३७०० बेड इतकी झाली आहे. नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये २२०० बेड कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामध्ये २०० एचडीयू बेड्स तर ३०० ऑक्सिजन बेड होते.

नेस्को कोविड केंद्रातील ‘ई’ सभागृहात असलेल्या १५०० बेड्सपैकी १ हजार ऑक्सिजन बेड तर उर्वरित ५०० सर्वसाधारण बेड आहेत. प्रत्येक बेडला पंखा, लॉकर व खुर्ची पुरवण्यात आली आहे. सध्या २०० बेड कार्यान्वित करुन या सभागृहातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला असून टप्प्या-टप्प्याने सर्व बेड कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

या नवीन सुविधेसाठी ११०० मनुष्यबळ नेमलं आहे. यामध्ये  ५० सिनियर कन्सल्टंट, १६० निवासी वैद्यकीय अधिकारी, ३२० परिचारिका, ४८० रुग्णसेवा सहायक आणि ९० तांत्रिक कर्मचारी वर्ग यांचा समावेश आहे.

  


हेही वाचा -

  1. मुंबईतील बेघरांचंही लसीकरण करणार- महापौर

  1. आता Whatsapp वर मिळवा लसीकरण केंद्रांची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा