Advertisement

मुंबईत उभारलं सर्वात मोठं सार्वजनिक शौचालय, टीव्ही, वायफायची सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं या भागात सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय बांधलं आहे.

मुंबईत उभारलं सर्वात मोठं सार्वजनिक शौचालय, टीव्ही, वायफायची सुविधा
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईत सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय बांधलं आहे. हे शौचालय सर्वात मोठे तर आहेतच. यासोबतच वेटिंग क्षेत्रात वृत्तपत्र, टीव्ही सेट आणि वायफाय सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे खास शौचालय मुंबईच्या जुहू गल्लीत बांधले गेलं आहे.

४००० चौरस फूट भागात पसरलेल्या या दुमजली शौचालयात खालच्या मजल्यावर ६० आणि पहिल्या मजल्यावर २८ शौचालयं आहेत. एकूण ८८ शौचालयांसह हे शहरातील सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय बनलं आहे. सुमारे ६० हजार झोपडपट्टीवासीयांना या सार्वजनिक शौचालयाचा फायदा होईल. त्याच्या अमर्याद वापरासाठी प्रत्येक कुटुंबाला दरमहा ६० रुपये द्यावे लागतील.

या खास शौचालयात एक लहान बोटॅनिकल गार्डन देखील आहे. काँग्रेसचे नगरसेवक मेहर मोहसीन हैदर म्हणाले की, हे प्रसाधनगृह शहरातील सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय आहे. तर यामध्ये चोवीस तास स्वच्छता देखील आहे. बाथरूममधील वरचा मजला पुरुषांसाठी आहे, तळ मजला स्त्रियांसाठी आहे आणि चार ब्लॉक विशेष-सक्षमांसाठी आहेत.

मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे (एमआरसीसी) अध्यक्ष भाई जगताप यांनी या शौचालयाचं शनिवारी उद्घाटन केलं. एरिया कौन्सिलर मेहर मोहसीन हैदर यांनी यापूर्वी मुंबईतील गिलबर्ट हिलजवळ ५५ आसनांचे सार्वजनिक शौचालय बांधलं होतं.

यासह, शहरातील मोठ्या वाहतुकीच्या सिग्नलवर पीलिकेनं ८० मल्टि-युटिलिटी एसी सुविधा मोबाइल टॉयलेट व्हॅन बसवण्याचंही नियोजन केलं आहे. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या योजनेस उशीर झाला आहे.



हेही वाचा

घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामावर एनएमएमसीची कारवाई

मुंबई अग्निशमन दलात स्वच्छतेसाठी खासगी यंत्रणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा