Advertisement

कोस्टल रोडचं भूतांत्रिक सर्वेक्षण तातडीनं करा-आयुक्तांचे आदेश

शामदास गांधी मार्गाच्या (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या ९.९८ किमी लांबीच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामाची पूर्वतयारी पालिकेकडून सध्या जोरात सुरू आहे.

कोस्टल रोडचं भूतांत्रिक सर्वेक्षण तातडीनं करा-आयुक्तांचे आदेश
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील बोगदा, पूल आणि जेट्टीसारख्या कामांचं भूतांत्रिक सर्वेक्षण तातडीनं विशिष्ट मुदतीत पूर्ण करावं असे आदेश मंगळवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. त्याचवेळी बोगदा, पूल आणि जेट्टीचं अंतिम डिझाईनही लवकरात लवकर सादर करावं असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळं आता या  प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.


बोगद्याच्या कामांची पाहणी 

पालिकेनं कोस्टल रोडच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. शामदास गांधी मार्गाच्या (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपुलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या ९.९८ किमी लांबीच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामाची  पूर्वतयारी पालिकेकडून सध्या जोरात सुरू आहे. या कामांना चांगलाच वेग घेतला असून या कामाची पाहणी मंगळवारी आयुक्तांनी केली. यावेळी आयुक्तांनी प्रियदर्शनी पार्कजवळून सुरू होणाऱ्या बोगद्याच्या पूर्वतयारी कामांची पाहणी केली. 


अंतिम आरेखनाचे अादेश

वरळी, हाजीअली आणि अमरसन्स उद्यान इथे प्रस्तावित असलेली जेट्टी, इंटरचेंज स्वरूपाचा पूलाच्या पूर्वतयारी कामांची पाहणी यावेळी आयुक्तांकडून करण्यात आली. या कामाची पाहणी पूर्ण केल्यानंतर आयुक्तांनी बोगदा, पूल आणि जेट्टीच्या कामाचं भूतांत्रिक सर्वेक्षण आणि अंतिम आरेखन (डिझाईन) तातडीनं करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 



हेही वाचा - 

सिडको लाॅटरी-विजेत्यांना दिलासा, १४ डिसेंबरपर्यंत सादर करता येणार कागदपत्र

धारावी पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा