Advertisement

धारावी पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी

विशेष प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकार आणि खासगी कंपनी यांच्याकडून एकत्रितपणे मार्गी लावण्यात येणार आहे. तर सर्वच्या सर्व पाचही सेक्टरचा एकत्रितपणे आता पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्याची माहिती डीआरपीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

धारावी पुनर्विकासासाठी अखेर निविदा जारी
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डिआरपी)ने अखेर शुक्रवारी पुनर्विकासाच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा जारी केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्यादृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या निविदेला कसा आणि किती प्रतिसाद मिळतो यावरच धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून आहे.


विशेष प्रकल्पाचा दर्जा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठिकाणी अशी ओळख निर्माण करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. एकत्र प्रकल्प मार्गी लागत नसल्यानं ५ सेक्टरमध्ये प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी निविदा मागवल्या. पण निविदेला बिल्डरांनी अनेकदा ठेंगा दाखवला नि प्रकल्प कागदावरच राहिला. राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प असताना हा प्रकल्प मार्गी लागत नसल्यानं अखेर काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला.


एकत्रितपणे पुनर्विकास

विशेष प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने हा प्रकल्प सरकार आणि खासगी कंपनी यांच्याकडून एकत्रितपणे मार्गी लावण्यात येणार आहे. तर सर्वच्या सर्व पाचही सेक्टरचा एकत्रितपणे आता पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठीच शुक्रवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात आल्याची माहिती डीआरपीमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

२८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान कंपन्यांना-बिल्डरला निविदा सादर करता येणार आहेत. तर निविदेनुसार कंत्राटदर कंपनीवर पुनर्विकासाची संपूर्ण जबाबदारी प्रकल्पाचं डिझाईन तयार करण्यापासून बांधकाम करत रहिवाशांचं योग्य ते पुनर्वसन करण्यापर्यंतची जबाबदारी असणार आहे.हेही वाचा-

धारावी सेक्टर-५ म्हाडाकडून जाणार डीआरपीच्या ताब्यात

धारावी पुनर्विकासासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा