Advertisement

कोस्टल रोडचा 'सल्ला' महागडा, खर्च २२५ कोटींवर

नरिमन पॉईँट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीत भराव टाकून एकूण ३५.६० कि.मी लांबीचा मुंबई सागरी किनारी रस्ता (कोस्टल रोड) बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कोस्टल रोडचं काम वर्षभरात सुरु करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या कामासाठी आतापर्यंत ४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोस्टल रोडचा 'सल्ला' महागडा, खर्च २२५ कोटींवर
SHARES

मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या कोस्टल रोडचं काम तीन टप्प्यात होणार असून त्यासाठी आणखी ३ स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येत आहे. या ३ कंत्राटदारांवर सल्लागारांची नजर राहणार असून यासाठी ३ स्वतंत्र सल्लागारांची निवड करण्यात येत आहे. या सर्व सल्लागारांवर सुमारे २२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत.

नरिमन पॉईँट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीत भराव टाकून एकूण ३५.६० कि.मी लांबीचा मुंबई सागरी किनारी रस्ता (कोस्टल रोड) बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या कोस्टल रोडचं काम वर्षभरात सुरु करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. या कामासाठी आतापर्यंत ४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.


कंत्राटदारांची नेमणूक

या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल बनवण्यासाठी मेसर्स स्टूप कन्स्लंटट्स आणि इ/ अॅण्ड वाय यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या सल्लागाराने बनवलेल्या अहवालाचं पुनर्विलोकन करण्यासाठी फ्रिशमन प्रभू या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली. परंतु आता प्रकल्पाचं काम तीन भागांमध्ये विभागून दिलं जात आहे. त्यातील दोन भागांसाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी लुईस बर्जर कन्स्लटींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि इजिस इंडिया कन्स्लटींग इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या कामासाठी सल्लागाराची निवड करण्यासाठी फेरनिविदा मागवण्यात येत आहे.


किती रुपये खर्च?

प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचं दक्षिण टोक या २ भागांचं स्वतंत्रपणे कंत्राट दिलं जाणार असून त्या कंत्राट कामांची देखभाल या सल्लागारांमार्फत केली जाणार आहे. यासाठी या दोन्ही सल्लागारांना अनुक्रमे ६९.८६ कोटी आणि ५५.२५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन सल्लागारांवर १२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या सल्लागारावरही सुमारे ६८कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

त्यामुळे केवळ ३ सल्लागारांवरच सुमारे पावणे दोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यापूर्वी स्टूप आणि फ्रिशमन प्रभू यांच्यावरही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार असून सल्लागारांवरील हा खर्च सव्वा दोनशे कोटींच्या घरात पोहोचला आहे.


३ भागांमध्ये विभागणी

कोस्टल रोडचं काम ३ भागांमध्ये विभागून करण्यात येणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राटदारांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी या ३ सल्लागारांची निवड करण्यात येत असल्याचं कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता माचीवाल यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी स्टूप या सल्लागाराने बनवलेल्या तांत्रिक अहवालाचं पुनर्विलोकन करण्यासाठी फ्रिशमन प्रभू यांची निवड करण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं. तिसऱ्या भागातील कामासाठीच्या सल्लागाराची फेरनिवड करण्यासाठी पुन्हा निविदा मागवण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


किती निधीची तरतूद?

कोस्टल रोडसाठी यावेळच्या अर्थसंकल्पात १५०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी या प्रकल्पाचे काम हाती घेतलं जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. मात्र तीन सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटदारांचं काम चालणार आहे. कंत्राटदारांच्या निविदा मागवण्यापासून ते कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्याचं काम सल्लागारामार्फत केलं जाणार आहे.


कसं होणार कोस्टल रोडचं काम?

  • एकाचवेळी तीन भागांमध्ये होणार कोस्टल रोडचं काम
  • प्रिन्सेंस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्क
  • प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस
  • बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिण टोक



हेही वाचा-

जकात नाक्यांच्या जागांवर ‘कोस्टल रोड’चं कास्टिंग यार्ड

कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा