SHARE

मुंबईतील कोस्टल रोडसाठीची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून वर्षभरात या कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे. या संपूर्ण २९.२ कि.मी प्रकल्पासाठी १५ हजार कोटींची खर्च असून त्यासाठी यंदा १५०० कोटींची तरतूद महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


फायद्यांचा महामार्ग

हा प्रकल्प पर्यावरण फायद्यामुळे एकमेवद्वितीय, असा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे ५४ हेक्टर हरित पट्ट्यासह मोकळ्या जागा उपलब्ध होणार आहेत. एवढंच नाही तर कार्बन डायआॅक्साईड उत्सर्जनात घट होण्यासही मदत होईल. हरित पट्टा आपत्कालिन आणि जलद बस वाहतूक मार्गिकेसह शहरातील हा एकमेव मार्ग असेल, असं त्यांनी सांगितलं.


गावठाणातील रस्तेही काँक्रिटचे

मुंबई शहरातील रस्त्यांचा विकास करताना गावठाणांमधील रस्त्यांचाही विकास केला जाणार आहे. गावठाणांमधील रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवले जाणार आहेत. यासाठी प्रथमच गावठाणामधील रस्त्यांचा विकास काँक्रिटीकरणाद्वारे होत असून यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


पुलांना सरकते जिने

पादचारी पुलांचा वापर जास्तीत जास्त लोकांकडून व्हावा यासाठी कुर्ला येथील पुलाला प्रायोगिक तत्त्वावर सरकते जिने बसण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचसोबत पादचारी पूल आणि स्कायवॉकसाठीही जिथं शक्य होईल तिथे स्वयंचलीत जिने बसवण्यात येणार आहे. मरिन ड्राईव्ह पादचारी पुलावर अशाप्रकारे सरकते जिने बसवण्याची तांत्रिक शक्यता तपासून पाहिली जात असल्याचं आयुक्तांना सांगितलं.


रस्ते कामांसाठी दुप्पट वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रस्ते कामांसाठी दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यंदा रस्ते विकास कामांसाठी २०१५८ कोटींची तरतूद करण्यात आली. यामधून सध्य सुरु असलेली प्राधान्य क्रम २ मधील कामे तसेच प्राधान्यक्रम ३ मधील कामे तसंच प्रकल्प रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.हेही वाचा-

मुंबईत 'रिसायकलिंग'! ४० ठिकाणी होणार सायकल ट्रॅक


संबंधित विषय
ताज्या बातम्या