Advertisement

पालिका नेपियनसी रोडचे सुशोभिकरण, रुंदीकरण करणार

या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

पालिका नेपियनसी रोडचे सुशोभिकरण, रुंदीकरण करणार
Representative image
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) नेपियन सी रोडवरील संपूर्ण एक किलोमीटर लांबीच्या फूटपाथचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करून ते पादचाऱ्यांसाठी अनुकूल बनवण्याची योजना प्रस्तावित केली आहे. हा रस्ता दक्षिण मुंबईतील मलबार हिलजवळ आहे.

या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. बांधकामाचे काम नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित आहे आणि ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी विविध कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांद्वारे निधी दिला जातो. विकास प्रक्रियेत स्थानिक रहिवाशांचाही सहभाग असतो.

डी प्रभागातील सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं की, फूटपाथची सरासरी रुंदी २.५ मीटरपेक्षा कमी होणार नाही. कॅरेजवे ६.५ मीटर रुंद असेल. पार्किंग क्षेत्रे आणि जंक्शनमध्ये फूटपाथ पाच मीटर इतका रुंद असू शकतो.

ते पुढे म्हणाले की, झेब्रा क्रॉसिंग असलेल्या रस्त्याचा काही भाग उंच केला जाईल. पादचारी आणि दिव्यांग व्यक्तींना क्रॉसिंग करताना फूटपाथवरून खाली उतरावे लागणार नाही याची काळजी घेतली जाईल. योजनेनुसार ते सध्याच्या बसस्थानकाजवळ बेस्टच्या गाड्यांसाठी वेगळी जागा उपलब्ध केली जाईल.

वास्तुविशारद आणि नेपियन सी रोड सिटीझन फोरमचे अध्यक्ष राहुल कादरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, या प्रकल्पाचा उद्देश लोकांना रस्त्यावर वाहने न वापरता चालण्यास प्रोत्साहित करणं आहे. नेपियन सी रोडच्या रहिवाशांना १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रुंद फूटपाथ मिळणार आहेत.



हेही वाचा

मुंबईत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कोविड रुग्ण ५०% कमी

ठाणे महानगरपालिकेची डोर टू डोर लसीकरण मोहीम ठरतेय वरदान

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा