Advertisement

मध्य वैतरणा जलाशयातून होणार १०० मेगावॅट विद्युत निर्मिती

मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधण्यात आले. या धरणाचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण केले आहे.

मध्य वैतरणा जलाशयातून होणार १०० मेगावॅट विद्युत निर्मिती
SHARES

मध्य वैतरणा जलाशयात २० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत, तर ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा असा एकूण १०० मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पास मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पाद्वारे संकरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी मुंबई महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. 

या प्रकल्पातून दरवर्षी २०८ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५३६ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचा खर्च व पुढील २५ वर्षे प्रकल्पाचे परिचालन व परिरक्षण खर्च विकासकाला करावा लागेल. प्रकल्पाची मालकी ही पालिकेचीच असली तरी खर्चाचा भार नसेल.

मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधण्यात आले. या धरणाचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय असे नामकरण केले आहे. धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा तसेच जलविद्युत निर्मितीसाठी संयुक्तिक बर्हिगामी जलवाहिनी टाकल्या हाेत्या.

या जलाशयातून जलविद्युत निर्मितीसाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १२ डिसेंबर २०१९ रोजी पालिकेला परवानगी दिली. पालिकेची विजेची मागणी अधिक असल्याने बांधा, वित्तपुरवठा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर जलविद्युत निर्मितीसह सौरऊर्जा निर्मिती अधिक फायदेशीर ठरेल, असे सल्लागारांनी त्यावेळेस सुचविले. ही शिफारस स्वीकारून पालिकेने कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर मॉडेलनुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या.

तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यातून कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणारा ५३६ कोटींचा खर्च कंत्राटदार करणार असून  प्रचालन व देखभालीचा खर्च २५ वर्षांसाठी कंत्राटदाराकडेच राहणार आहे. या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी विद्युत ऊर्जा ही राज्य वीज वितरण कं पनीच्या पायाभूत सुविधांमार्फत पालिकेच्या जलप्रक्रिया केंद्रांमध्ये वापरली जाणार आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी वीज बिलाचे २४ कोटी वाचणार आहेत.

या प्रकल्पात तयार होणारी वीज पालिका खरेदी करणार आहे. वीज खरेदीचा दर हा निविदा प्रक्रियेतील मुख्य मापदंड आहे. त्यानुसार  वीज खरेदीचा दर प्रतियुनिट ४ रुपये ८४ पैसे यावरून प्रतियुनिट ४ रुपये ७५ पैसे इतका निश्चित करण्यात आला. हा दर पुढील २५ वर्षांसाठी समतुल्य दर राहणार आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका वीज खरेदी करार करणार आहे. याचाच अर्थ पुढील २५ वर्षे महानगरपालिका प्रतियुनिट ४ रुपये ७५ पैसे याच दराने विकासकाकडून वीज खरेदी करणार आहे.हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा