Advertisement

लाॅकडाऊनमुळे रेल्वेच्या पादचारी पुलांची कामं रखडली

लाॅकडाऊनचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. रेल्वेकडून सुरू असलेल्या पादचारी पुलांची कामंही रखडली आहेत.

लाॅकडाऊनमुळे रेल्वेच्या पादचारी पुलांची कामं रखडली
SHARES

लाॅकडाऊनचा मोठा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. रेल्वेकडून सुरू असलेल्या पादचारी पुलांची कामंही रखडली आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकातील जुन्या व नवीन ३५ पादचारी पुलांची कामं पूर्णपणे थांबली आहेत. 

लाॅकडाऊनच्या आधी पश्चिम रेल्वेवरील २० आणि मध्य रेल्वेवरील १५ पुलांची कामे सुरू होती. मात्र, आता ही कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. लाॅकडाऊन उठून सर्व सुरळीत झाल्यानंतरच या कामांना पुन्हा सुरूवात होईल. मात्र, आता ही कामे पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे.

प्रभादेवी स्थानकात पुलावरील चेंगराचेंगरी आणि त्यानंतर गोखले आणि सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून स्थानकातील जुन्या-नवीन पादचारी पुलांच्या कामांना सुरूवात करण्यात आली.  पश्चिम रेल्वेवरील खार, अंधेरी, माहीम, वांद्रे, सांताक्रुझ, मुंबई सेन्ट्रल, गोरेगाव, मालाड, तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विक्रोळी, ठाणे, डोंबिवली, ठाकुर्ली, कसारा, शिवडी, उल्हासनगर, कोपर, बदलापूर, पनवेलसह आदी स्थानकातील पुलांचा याममध्ये समावेश आहे.एकाच वेळी काही स्थानकात नवीन पुलांचे काम आणि जुन्या पुलांची दुरुस्ती सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत होते. आता ही सर्व कामं रखडली आहेत.

 या कामावर असलेले कंत्राटी कामगार उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतील आहेत. अनेकजण मुंबई सोडून त्यांच्या गावी गेले आहेत. टाळेबंदीनंतर ते तातडीने उपलब्ध होण्याची चिन्हे कमीच असल्याचे सांगण्यात आले. परिणामी पादचारी पुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असेल.


हेही वाचा -

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन - नरेंद्र मोदी

मार्च, एप्रिलचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ

प्रसिद्ध अभिनेत्री सेजल शर्माची अंधश्रद्धेतूनच आत्महत्या, मिञाविरोधात गुन्हा दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा