Advertisement

मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव पहाडीच्या जागेचा विचार

मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव पहाडीची जागा द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएनं राज्य सरकारकडे केली आहे. गोरेगाव पहाडीमध्ये १२९.१० हेक्टरपैकी ८९ हेक्टर जमीन सरकारनं मेट्रो यार्डसाठी ताब्यात घेतलेली आहे.

मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव पहाडीच्या जागेचा विचार
SHARES

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने देऊन राज्य सरकारला मोठा दणका दिला. आता राज्य सरकारनं कारशेडसाठी  पर्यायी जागा म्हणून गोरेगाव पहाडीचा विचार सुरू केला आहे. 

आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी आरेऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती. मात्र, कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हे प्रकरण आता न्यायालयात आहे. कांजूरमार्गची जमीन मेट्रो कारशेडसाठी न मिळाल्यास प्लॅन बी म्हणून गोरेगाव पहाडीच्या जागेचा मेट्रो कारशेडसाठी विचार केला जात आहे. 

मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव पहाडीची जागा द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएनं राज्य सरकारकडे केली आहे. गोरेगाव पहाडीमध्ये १२९.१० हेक्टरपैकी ८९ हेक्टर जमीन सरकारनं मेट्रो यार्डसाठी ताब्यात घेतलेली आहे. त्यातील मेट्रो ६ प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्णसुद्धा झालं आहे. आता एमएमआरडीएला कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागातील आणखी १८ हेक्टर जमीन हवी आहे.

मेट्रो ६ प्रकल्प हा १६ किलोमीटरच्या टप्प्याचा असून, तो जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि विक्रोळी-लोखंडवालादरम्यान बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे ६६९१ कोटी रुपये आहे. 



हेही वाचा -

राजहट्ट व बालहट्टासाठीच मेट्रो कारशेडची जागा बदलली- किरीट सोमैय्या

ब्रिटन, आखाती देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन, मुंबई महापालिकेचा निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा