Advertisement

सिडकोच्या घरांना तुफान प्रतिसाद, आतापर्यंत १ लाख ५३ हजार जणांनी केली नोंदणी

चांगल्या प्रतिसादाच्या जोरावर नोंदणीचा आकडा २ लाखांच्या, तर अर्जविक्रीचा आकडा दीड लाखापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. तर १ लाखांहून अधिक अर्ज सादर होतील, अशी शक्यता आहे.

सिडकोच्या घरांना तुफान प्रतिसाद, आतापर्यंत १ लाख ५३ हजार जणांनी केली नोंदणी
SHARES

सिडकोच्या घरांना इच्छुकांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी आतापर्यंत १ लाख ५३ हजार इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर १ लाख २९ हजार इच्छुकांनी अर्ज भरले असून ७९ हजार ६६४ इच्छुकांनी अनामत राकमेसह अर्ज सादर केलयाची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. अजूनही अर्ज भरण्यासाठी ५ दिवस शिल्लक आहेत त्यामुळे अर्ज स्वीकृतीचा, अर्ज सादर करत प्रत्यक्ष लाॅटरीत सहभागी होणाऱ्यांचा आकडा सव्वा लाखाच्या घरात जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.


कुठं आहेत घरं?

घणसोली, कळंबोली, द्रोणागिरी, खारघर आणि तळोजा येथील अत्यल्प आणि अल्प गटांतील घराच्या लॉटरीसाठी अर्जविक्री अर्जस्वीकृतीची प्रक्रिया सध्या सिडकोकडून सुरू आहे. ही घरं पंतप्रधान आवास योजनेतील असल्याने, गरिब गटासाठी घर असल्याने या घरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लॉटरीतील अत्यल्प गटातील घरासाठी अडीच लाख रुपये अनुदान आणि अल्प गटातील घरासाठी अडीच लाखापर्यंत गृहकर्जात सवलत मिळणार आहे.


मुहूर्ताचा फायदा

गृहप्रवेश करताना वा घराची नोंदणी करण्यासाठी अनेकजण मुहूर्ताला प्राधान्य देतात. त्यानुसार गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवादरम्यान इच्छुक या लाॅटरीला चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृतीसाठी ५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात नोंदणी अर्ज विक्री आणि स्वीकृती वाढेल, असं ही रातांबे यांनी सांगितलं.


स्वतंत्र अॅप

चांगल्या प्रतिसादाच्या जोरावर नोंदणीचा आकडा २ लाखांच्या, तर अर्जविक्रीचा आकडा दीड लाखापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. तर १ लाखांहून अधिक अर्ज सादर होतील, अशी शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे सिडकोने खास लॉटरीसाठी स्वतंत्र मोबाईल अॅप सोमवार १० सप्टेंबरपासून सुरू केलं आहे. त्यामुळे आता अर्ज भरणं, अर्ज सादर करणं अगदी सहज सोपं झालं आहे, असंही रातांबे यांनी स्पष्ट केलं. यामुळे देखील लाॅटरीतील इच्छुकांचा आकडा वाढेल हे नक्की.



हेही वाचा-

'पीएमएवाय'मध्ये नोंदणी करायचीय? मग सकाळी ९ ते १ अशी वेळ काढा

खूशखबर! नोव्हेंबरमध्ये १००० घरांची लॉटरी!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा