सिडकोच्या 1100 घरांची सोडत लवकरच सुरू होणार

घरस्वप्न पाहणाऱ्या 1100 जणांना सिडकोकडून “व्हॅलेंटाईन्स डे” ची भेट आज दिली जाणार आहे. या सोडतीत 1100 घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सिडकोने या घरासाठी महागृहनिर्णाण योजनेअंतर्गत नवीन सोडत काढली. या घरांच्या सोडतीचा निकाल आज होणार आहे. या योजनेची सोडत सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे सकाळी 11.00 वाजता सुरू होणार

SHARE

घरस्वप्न पाहणाऱ्या १ हजार १०० जणांना सिडकोकडून 'व्हॅलेंटाईन्स डे'ची भेट आज दिली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून २ आॅक्टोबरला सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेसह अन्य योजनेतील १४ हजार ८३८ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत १ हजार १०० घरांना प्रतिसाद न मिळाल्यानं सिडकोनं या घरासाठी महागृहनिर्णाण योजनेअंतर्गत नवीन सोडत काढली. या घरांच्या सोडतीचा निकाल आज होणार आहे. या योजनेची सोडत सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर इथं सकाळी ११.00 वाजता सुरू होणार आहे.


सोडतीतील घरांसाठी 58 हजार अर्ज

सिडकोनं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २ ऑक्टोबर, २०१८ रोजी १४ हजार ८३८ सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत सुमारे १ हजार १०० घरांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या घरांसाठी शून्य अर्ज आल्यानं घर सोडतीविना पडून राहिली. यात पत्रकार आणि इतर प्रवर्गातील घरांचा समावेश होता. म्हाडा कायद्यानुसार ज्या प्रवर्गातील घरांसाठी शून्य अर्ज येतात ती घरं सर्वसाधारण गटातील प्रतिक्षायादीवरील विजेत्यांना वितरीत केली जातात.

सिडकोमध्ये मात्र अशी कोणतीही तरतुद नाही. त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळालेली घर तशीच पडून राहतात. ही बाब लक्षात घेता नुकतीच सिडकोनं अशा घरांसाठी स्वतंत्र लाॅटरी काढण्याची तरतुद केली. त्यामुळेच सोडतीविना पडून असलेल्या १ हजार १०० घरांसाठी सिडकोनं वेगळी लाॅटरी काढण्याचा निर्णय घेतला. जानेवारीत या १ हजार १०० घरांसाठी सिडकोनं जाहिरात दिली होती. या घरांसाठी ५८ हजार ७८६ अर्ज आले आहेत. 


घरांची वैशिष्ठ काय आहेत

नवी मुंबईतील ही गृहनिर्माण योजना तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समधील एकूण ११ ठिकाणी साकार होत आहे. एकूण १ हजार १०० सदनिकांपैकी ७३ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तर उर्वरित १ हजार ൦२७ सदनिका या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. सिडकोच्या आजवरच्या गृहनिर्माण योजनांप्रमाणेच उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बांधकाम, किफायतशीर दर ही याही योजनेची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.


संबंधित विषय
ताज्या बातम्या