Advertisement

७ हजार घरांसाठी प्रतिक्षा यादीवरील ग्राहकांना सिडको संधी देणार

सिडकोच्या 15 हजार घरांसाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज आले होते. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 2019 मध्ये आणखी 9 हजार घरांची सोडत सिडकोने काढली.

७ हजार घरांसाठी प्रतिक्षा यादीवरील ग्राहकांना सिडको संधी देणार
SHARES

नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये 25 हजार घरांची योजना सिडकोने 2018 मध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जाहीर केली होती. या योजनेची सोडत काढण्यात आली होती. यामधील लाभार्थ्यांना 1 जुलैपासून घरांचा ताबा देण्यास सुरूवात झाली.  मात्र, आता अर्ज छाननीत बाद ठरलेल्या जवळपास 7 हजार घरांसाठी प्रतिक्षा यादीवरील ग्राहकांना सिडको संधी देणार आहे. 

सिडकोच्या 15 हजार घरांसाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज आले होते. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून 2019 मध्ये आणखी 9 हजार घरांची सोडत सिडकोने काढली. मात्र, विविध कारणांमुळे या दोन्ही गृहप्रकल्पातील 7 हजार घरे विक्रीविना पडून आहेत. यामध्ये 4,466 घरे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. या घरांची सोडतही काढण्यात आली. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

सिडकोने पुढील चार वर्षात 89 हजार घरं बांधण्याचं जाहीर केलं आहे. नवीन योजना जाहीर करण्याअगोदर शिल्लक असलेल्या 7 हजार घरांची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार लवकरच  शिल्लक घरांसाठी सोडत काढली जाण्याची शक्यता  आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीवरील ग्राहकांना प्रथम संधी दिली जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा