चेंबूरमध्ये खोदकाम, नागरिक त्रस्त

 Chembur
चेंबूरमध्ये खोदकाम, नागरिक त्रस्त
चेंबूरमध्ये खोदकाम, नागरिक त्रस्त
चेंबूरमध्ये खोदकाम, नागरिक त्रस्त
See all

चेंबूर - विजेची तार टाकण्यासाठी चेंबूरच्या मुख्य बाजापेठेमध्ये पूर्ण रस्ताच खोदून ठेवला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालक आणि स्थानिक दुकानदारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळपासून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

चेंबूरच्या एम पश्चिम वॉर्डपासून ते डेंभी पुलापर्यंत हा रस्ता खोदण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले असल्याने याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यातच रिलायन्स एनर्जीकडून हे खोदकाम केल्याने या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे.

Loading Comments