Advertisement

रेल्वेच्या आवारातच ‘स्वच्छ भारत अभियान’चे तीनतेरा


रेल्वेच्या आवारातच ‘स्वच्छ भारत अभियान’चे तीनतेरा
SHARES

चर्चगेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात मोठ्या प्रमाणात स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार केला. त्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत पश्चिम रेल्वेनेही स्वच्छतेचा सूर छेडला. पण, रेल्वेने स्वतःच्या अंतर्गत कार्यालय परिसरातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं असल्याचं दिसून आलं आहे. चर्चगेट स्थानकातील अप्पर पोलीस महासंचालक, लोहमार्ग कार्यालयाबाहेरच मोठया प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. इमारतीच्या बाहेरील फुटपथावर मोठ्या प्रमाणात कंस्ट्रक्शन केलेलं रॅबीट, कचऱ्याचा ढीग जमा आहे. तसंच इमारतीच्या बंद असलेल्या जीन्याच्या परिसरात कचरा साचला आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन म्हापूतकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हा विभाग माझ्याकडे येत नसून संबंधित अधिकाऱ्याला सांगण्यात येईल असं सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा