Advertisement

कांदिवली स्थानकावरील मधला फूट ओव्हर ब्रिज बंद

२२ सप्टेंबरपासून हा फूट ओव्हर ब्रिज बंद होणार आहे.

कांदिवली स्थानकावरील मधला फूट ओव्हर ब्रिज बंद
SHARES

पश्चिम रेल्वेने (WR) कांदिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3 आणि 4 वरील मिडल फूट ओव्हर ब्रिज (FOB) च्या उत्तरेकडील जिना २२ सप्टेंबरपासून बंद करण्याची घोषणा केली आहे.

अधिकृत निवेदन प्रसिद्ध करताना, WR अधिकाऱ्याने सांगितले की, "कांदिवली स्थानकाच्या सुधारणा कामाच्या संदर्भात, मधला FOB उत्तर बाजूला 4 मीटरने रुंद केला जाणार आहे. या FOB च्या रुंदीकरणाच्या कामासाठी, प्लॅटफॉर्म क्र. 2/3 आणि 4 ला जोडणारा उत्तरेकडील जिना तोडला जाईल. त्यासाठी 22 सप्टेंबर 2023 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. प्रवासी FOB च्या दक्षिणेकडील जिना बांधकाम पूर्ण होईपर्यंतवापरू शकतात. झालेल्या गैरसोयीबद्दल पश्चिम रेल्वेला खेद आहे."



हेही वाचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेशोत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

मुंबईतल्या 'या' 28 मेट्रो स्टेशनवर शेअर ऑटो-टॅक्सी स्टँड होणार सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा