मेट्रो बिघडली, मुंबईकर त्रस्त

 Ghatkopar
मेट्रो बिघडली, मुंबईकर त्रस्त

मुंबई - मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यानं मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली होती. गुरुवारी दुपारी मेट्रोच्या ओव्हरहेड वायरमध्ये घाटकोपर ते एअरपोर्ट रोडदरम्यान बिघाड झाला. यानंतर मेट्रोची वाहतूक थांबवण्यात आली. प्रवाशांना मधेच उतरवण्यात आलं. मेट्रोतील बिघाडामुळे प्रवाशांना नापक पायपीट करावी लागली आहे. याचे काही व्हिडीओ प्रवाशांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. पण तासाभराच्या प्रयत्नानंतर मेट्रोची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Loading Comments