Advertisement

मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना गती

ही मार्गिका यावर्षी डिसेंबरपूर्वी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना गती
SHARES

देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं एकिकडं वाहतुक सेवा बंद आहे, मात्र दुसरीकडे पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळत आहे. या लॉकडाउनच्या काळात एमएमआरडीएनं मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४ हजार ८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही मार्गिका यावर्षी डिसेंबरपूर्वी सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

मेट्रो-७ मार्गावर गर्डरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, गेल्या आठवड्यात मेट्रो-७ मार्गिकेच्या ४ स्थानकांसाठी ३० कंटेनरमधून १२ सरकते जिने आणि २ लिफ्टची आयात करण्यात आली आहे. यावेळी ही सामग्री सॅनिटायझर करण्यात आली असून सामग्री प्रत्यक्ष प्रकल्पस्थळावर दाखल झाली. मेट्रो-७ मार्गावर विकासकामं सुरू झाली आहेत.

या मार्गावरील पोईसर, मागाठाणे, दिंडोशी या स्थानकांवर प्रत्येकी ४ सरकते जिने, तर आकुर्ली स्थानकात २ लिफ्ट दाखल झाल्या आहेत. तसेच विविध प्रकल्पस्थळी काम करणाऱ्या कामगारांची एमएमआरडीएमार्फत विशेष काळजी घेतली जात आहे. कामगारांची डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. त्यांची राहण्याचीही सोय करण्यात आली असून, त्यांना स्वच्छतेचे धडेही दिले जात असल्याचं एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

अरूण गवळीच्या पॅरोलमध्ये 14 दिवसांची वाढ

मिठी नदीतून आतापर्यंत २९ टक्केच गाळ बाहेर, मुंबई यंदाही तुंबणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा