Advertisement

मिठी नदीतून आतापर्यंत २९ टक्केच गाळ बाहेर, मुंबई यंदाही तुंबणार?

पाऊस सुरू होण्यास अवघा महिना राहिला असताना नालेसफाईची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

मिठी नदीतून आतापर्यंत २९ टक्केच गाळ बाहेर, मुंबई यंदाही तुंबणार?
SHARES

दरवर्षी मुंबईत जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईला पुरस्थितीचा सामना करावा लागतो. यंदाही मुंबईला पुरस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पाऊस सुरू होण्यास अवघा महिना राहिला असताना नालेसफाईची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. लॉकडाऊनच्या काळात कामगार मिळत नसल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे. सध्या मुंबईसह राज्यभरातील जनतेला कोरोनाच्या विषाणूचा सामना करावा लागतो. अशातच नोकरी-धंदा बंद असल्यानं जगायचं कसं असा प्रश्न या मुंबईकरांना पडला आहे. मात्र, या परिस्थीती तोंड देत असताना पावसाळा येणार असल्यानं मुंबईकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

सोमवारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि माहीम येथे जाऊन मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामाची महापालिकेचे नवे आयुक्त आय. एस. चहल यांनी  पाहणी केली. मुंबई शहराबरोबरच पूर्व व पश्चिम उपनगरातून वाहणाऱ्या मिठी नदीतून दरवर्षी १.३ लाख मेट्रिक टन गाळ काढला जातो. यंदा हे काम आतापर्यंत २९ टक्के पूर्ण झाले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी ७० टक्के काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं नियोजन आहे.

हेही वाचा - यंदा सरासरी इतका पाऊस होणार; हवामान खात्याचा अंदाज

कोरोनाच्या संकटाचा फटका महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांना बसू नये याची काळजी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना केल्या आहेत. नाल्यांमधील गाळ काढण्याची कामं करण्यासाठी गरज भासल्यास कामगारांना २ शिफ्टमध्ये कामाला लावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

पावसाळापूर्व कामं करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असला तरी नगरसेवकांना वेगळीच चिंता भेडसावत आहे. नालेसफाई करण्यासाठी व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना मजूरच मिळत नाही. त्यामुळं यंदा कामांचा वेग खूपच कमी असल्याचं काही नगरसेवकांचं म्हणणं आहे.



हेही वाचा -

अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी निर्णय - उदय सामंत

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा