'गिरणी कामगारांची सोडत रद्द करा'

  Mumbai
  'गिरणी कामगारांची सोडत रद्द करा'
  मुंबई  -  

  मुंबई - वांद्र्यातील रंगशारदामध्ये 2 डिसेंबरला फुटणारी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत रद्द करण्याची मागणी गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघानं केलीय. शुक्रवारी संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवत ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायाधीश ए. एस. अग्यार यांच्या अध्यक्षतेखालील सनियंत्रक समितीला बाजूला सारत सोडतीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप संघाने केलाय. गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भातील प्रत्येक निर्णय हा या समितीच्यामार्फतच घेण्याचे आदेश असताना या आदेशाचा भंग म्हाडा, एमएमआरडीए आणि राज्य सरकारने केल्याचा आरोप संघाच्या चेतना राऊत यांनी केलाय. तर दुसरीकडे गिरणी कामगारांच्या अर्जांची छाननी न करताच सोडत काढण्यात येत असल्याने यात भ्रष्टाचार-दलाली होण्याची शक्यता असल्याचे राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळेच ही सोडत रद्द करावी आणि अर्जांची छाननी करत, सनिंयत्रक समितीच्या मार्गदर्शनाखाली सोडत काढावी अशी मागणीही संघाने केलीय. ही मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघाने दिलाय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.