Advertisement

'मेट्रो २ अ' मार्गिकेतील 'या' टप्प्याचं काम पूर्ण

लॉकडाऊच्या काळात मेट्रो मार्गिकेच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे.

'मेट्रो २ अ' मार्गिकेतील 'या' टप्प्याचं काम पूर्ण
SHARES

लॉकडाऊच्या काळात मेट्रो मार्गिकेच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच मेट्रो प्रकल्प - ३ च्या मार्गातील अवघड टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. त्याचप्रमाण, आता मेट्रो २ अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर) मार्गिकेच्या एका अवघड टप्प्याचे काम पूर्ण झालं आहे. शनिवारी या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून, पश्चिम रेल्वे मार्गावरील दहिसर आणि मीरा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर लोखंडी तुळया उभारण्याच्या कामाचा यात समावेश आहे.

मे २०२१ पर्यंत ही मार्गिका कार्यरत करायचे उद्दिष्ट आहे. ‘मेट्रो २ अ’ चा मार्ग दहिसर ते मीरा रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवरून जातो. या ठिकाणी शेकडो टन वजनाच्या तुळया उभारण्याचं काम एका रात्रीत पूर्ण करण्यात आले. मध्यरात्री १२.०५ पासून पहाटे ३.३५ वाजेपर्यंत हे काम करण्यात आले.

दहिसर येथील तुळयांची उभारणी नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु, हे कार्य निश्चित वेळेच्या २ महिने आधी पूर्ण करण्यात आलं. या कामामुळे जानेवारी २०२१ ला होणाऱ्या चाचण्यांना गती प्राप्त झाली आहे. रेल्वे आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे कार्य शक्य झाले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा