SHARE

मुंबई - मेट्रोचं जाळं आता डोंबिवलीतही विणलं जाणार आहे. दररोज लोकलच्या गर्दीत उभं राहून जाणारे डोंबिवलीकर आता लवकरच मेट्रोचा आरामदायी आणि गारेगार प्रवास करू शकतील. राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने डोंबिवलीतही मेट्रो पोहचवण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी दिली. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-5 चा विस्तार आता कल्याण ते डोंबिवली आणि पुढे तळोजापर्यंत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो ठाणे मेट्रो स्थानकाशी जोडली जाणार आहे.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तळोजा-डोंबिवली-कल्याण असा मेट्रो मार्ग उभारण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे एमएमआरडीएला आदेश दिले आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या