Advertisement

मुंबई अंधारात! एेन दिवाळीच्या तोंडावर भांडुप, मुलुंडमध्ये अडीच तास लोडशेडिंग


मुंबई अंधारात! एेन दिवाळीच्या तोंडावर भांडुप, मुलुंडमध्ये अडीच तास लोडशेडिंग
SHARES

प्रकाशाचा सण मानण्यात येणारी दिवाळी तोंडावर आलेली असतानाच मुंबईसह राज्य अंधारात गेले आहे. तब्बल २ हजार मेगावॅट विजेची टंचाई असल्याने महावितरणने गुरूवारपासून राज्यभर लोडशेडिंग लागू केले आहे. मुंबईतील भांडुप, मुलुंडसह मध्य उपनगरही लोडशेडिंगच्या कचाट्यातून सुटलेले नाही. यापुढे दिवसातून कुठलेही अडीच तास मुलुंडकर आणि भांडुपकरांना अंधारात काढावे लागणार आहे. तर ठाणे शहरातही तब्बल ७ तास लोडशेडिंग लागू करण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


कुठे-कुठे लोडशेडिंग?

  • मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि  मुलुंड, भांडुप वगळता मध्य उपनगरात बेस्ट आणि रिलायन्सकडून वीज पुरवठा 
  • तर, मुलुंड आणि भांडुपमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा 
  • त्यामुळे मुलुंड आणि भांडुपमध्ये अडीच तास लोडशेडिंग सुरू 
  • ठाणे शहरातही लोडशेडिंग लागू झाल्याने दिवा, मुंब्रा आणि कळव्यासारख्या परिसरात ७ तास लोडशेडिंग 


लोडशेडिंग का?

  • राज्याला १७ हजार ९०० मेगावॅट विजेची गरज  
  • प्रत्यक्षात केवळ १५ हजार ७०० मेगावॅट विजेचीच निर्मिती
  • २ हजार २०० मेगावॅट विजेचा तुटवडा
  • विजेसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने विजेची निर्मिती मंदावली
  • विजेची निर्मिती मंदावल्याने विजेचा तुडवटा, परिमाणी लोडशेडिंग


कोळसा गेला कुठे?

देशातील अनेक कोळसाखाणीतून पावसामुळे कोळसा पुरेशा प्रमाणात काढण्यात आलेला नाही. त्यामुळे देशभरात कोळशाची टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे.


मुलुंड-भांडुपला लवकरच दिलासा

कोळशा उपलब्ध व्हावा आणि विजेची निर्मिती वाढावी यासाठी महावितरणकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत काही तरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे. असे झाल्यास लोडशेडिंग हळूहळू कमी करता येईल. त्याचवेळीस मुलुंड आणि भांडुपमधील लोडशेडिंग, तर एक-दोन दिवसांतच रद्द करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

-पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा